मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ' 'च्या आगामी सीझनची जोरात चर्चा सुरू आहे. लवकच हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं म्हटलं जात होतं पण आता बिग बॉसचा १४ वा सीझन लांबणीवर पडल्याची माहिती आहे. 'बिग बॉस १४'चा सीझन चांगलाच चर्चेत आहे. या चर्चेमध्ये, बॉलिवूडचा भाईजान यंदाचा सीझन होस्ट करणार नसल्याचं म्हटलं जात होतं. पण, त्या केवळ अफवा असल्याचं समोर आलं . 'बिग बॉस १४'चा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. हा प्रोमो पाहता यंदाच्या सीझनमध्ये अनेक बदल करण्यात आले असल्याचं दिसत आहे. बिग बॉस १४ ची तयारी जोरात सुरू झाली आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळेसही सलमान खान शोमध्ये दमदार अंदाजात दिसणार आहे. यावेळी बिग बॉससाठी सलमानने केलेलं प्रोमोशूट बघून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एवढंच नाही तर बिग बॉसच्या सूत्रसंचलनासाठी त्याला २५० कोटी रुपये मानधन दिलं असल्याचं बोललं जातंय. तो आठवड्यातून एकदा दोन भागांचं चित्रीकरण करणार आहे. हा कार्यक्रम सप्टेंबरच्या शेवटी सुरु होणार होता. पण, आता उशीर होणार असं दिसतंय. मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये बिग बॉसचं घर तयार करण्यात येतं आहे. पण, सातत्याने होणाऱ्या पावसामुळे व्यत्यय येतोय. पाऊस थांबल्यावर बिग बॉसचं घर बांधण्याचं काम वेगानं सुरू होईल. .तसंच यंदा बिग बॉसच्या चौदाव्या पर्वाला ' ' हे शीर्षक देण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये सलमान म्हणतोय, की 'लॉकडाउनमुळे माझ्या सर्वसाधारण आयुष्यात स्पीड ब्रेकर आला आहे. त्यामुळं मी शेती करत आहे. पण, आता सीन पालटणार आहे.' त्यामुळं चाहत्यांमध्ये या शोबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. यंदाची थीम काय असणार, याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे. नव्या शोमध्ये , , , , शिरीन मिर्जा हे कलाकार दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jz8Hyp