Full Width(True/False)

रिया चक्रवर्ती प्रकरणी कूपर हॉस्पिटलच्या डीनने दिलं उत्तर

मुंबई- प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची गेल्या चार दिवसांपासून सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयने जवळपास ३५ तासांहून जास्त वेळ रियाची चौकशी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. रिया सुशांतच्या मृत्यूनंतर १५ जूनला कूपर इस्पितळाच्या शवागारात सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी गेली होती. खुद्द रियाने एका मुलाखतीत याची कबुली दिली. रियाच्या खुलासेनंतर सुशांतचं शवविच्छेदन करणार्‍या कूपर इस्पितळाच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने २६ ऑगस्ट रोजी कूपर इस्पितळाच्या डीन यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. सोमवारी, महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने कूपर इस्पितळाचे डीन आणि एचओडी यांची चौकशी केली होती. हे त्यांचे वकील जयश्री यांच्यासह महाराष्ट्र राज्य आयोग कार्यालयात दाखल झाले. १५ जूनला शवागारात गेल्याबाबत इस्पितळाला कोणतीही माहिती नसल्याचं गुर्जर यांनी सांगितले. त्यांनी चुकीचं काम करण्यास नकार दिला. पिनाकिन गुर्जर म्हणाले की, इस्पितळाच्या प्रशासनाने रिया चक्रवर्तीला शवागारात जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे रिया तिथपर्यंत कशी पोहोचली हे त्यांना माहीत नाही. आयोगाचे अध्यक्ष एमए सईद यांनी डीनला ७ सप्टेंबरपर्यंत या संदर्भात लेखी उत्तर देण्यास सांगितलं आहे. सध्या तरी डीनच्या उत्तरावर कमिशन समाधानी नाही. मुंबई पोलीस आहेत जबाबदार? कूपर हॉस्पिटलचे डीन डॉ. पिनाकिन गुर्जर यांनी स्वतःवरचे सारे आरोप फेटाळत मुंबई पोलिसांवर रियाच्या शवागारा जाण्याची परवानगी दिल्याचं म्हटलं. शवागारात गेल्याचं रियानेही केलं मान्य अलीकडेच एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सुशांतला शेवटचं पाहण्यासाठी शवागारात गेल्याचं तिने मान्य केलं. सुशांतच्या मृतदेहाकडे पाहून 'सॉरी बाबू'ही म्हणाली. रिया शवागारत जवळपास ४५ मिनिटं होती असं म्हटलं जात होतं पण रियाच्या सांगण्यानुसार ती तिथे चार ते पाच सेकंदच होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EPzBDl