मुंबई- प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. रिया चक्रवर्ती या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. सुशांत मुळचा बिहारचा होता. त्याने स्वबळावर पटणातून दिल्ली आणि नंतर मुंबईत प्रवास केला. पटणात जन्मलेल्या सुशांतसिंह राजपूत चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर, विशेषत: त्याच्या बहिणींवर रिया चक्रवर्तीने प्रश्न उपस्थित केले आहेत. आज सुशांतच्या या चार बहिणींबद्दल जाणून घेऊ.. नीतू सिंह उर्फ राणी सुशांतची मोठी बहीण आहे. सुशांत त्याच्या मोठ्या बहिणीला आईचा दर्जा देत होता. सुशांतच्या आईचं फार पूर्वी निधन झालं. अशा परिस्थितीत नीतू सिंहने सुशांतची आईसारखी काळजी घेतली. नीतूने हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी असलेले ओपी सिंह यांच्याशी लग्न केलं. मितू सिंह माजी क्रिकेटपटू होती. ती राज्यस्तरीय क्रिकेटपटू राहिली आहे. मीतू मुंबईत राहते आणि ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशी तीही सुशांतच्या घरी पोहोचली होती. मितू सिंहला सुशांत रूबी दी नावाने हाक मारायचा. सुशांतचं त्याच्या चारही बहिणींसोबत चांगलं नातं होतं. प्रियांका सिंह विवाहित असून पती सिद्धार्थ तंवर यांच्यासोबत दिल्लीत राहते. दोघेही व्यवसायाने वकील आहेत. सिद्धार्थ २००७ पासून दिल्ली उच्च न्यायालयात सराव करत होता. प्रियांका सुशांतसोबत मुंबईतही राहिली आहे. प्रियांका सिंहवर रिया चक्रवर्तीने विनयभंगाचा आरोप केला आहे. श्वेता सिंह सुशांतला न्याय मिळवून देण्याच्या मोहिमेमध्ये सर्वाधिक कार्यरत आहे. ती पती विशाल किर्तीसोबत अमेरिकेत राहते. २००७ मध्ये श्वेताचं लग्न झालं होतं. ती अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांत आणि त्याचं बहिणींसोबतचं बॉण्डिंगची झलक चाहत्यांना देत असते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DglciT