मुंबई :बॉलिवूडमधील , गटबाजीवरुन एकीकडे वादविवाद सुरू असतानाच अभिनेते यांनी यावरुन त्यांचं काहीसं वेगळं मत मांडलं आहे. घराणेशाहीचा आपल्याला कधीच कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचं ते म्हणाले. एका मुलाखतीत त्यांनी याबाबतची आपली मतं मांडली आहेत. 'मी माझ्या अभिनय कौशल्यावर काम करत होतो. आजही करतोय; हेच पुढेदेखील कायम राहील. इंडस्ट्रीमध्ये मला कधीच वेगळं वाटलं नाही; असं मी म्हटल्यावर कदाचित लोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल. पण, हा प्रवास आणि अनुभव माझा आहे. त्यामुळे आतापर्यंत तो कसा होता हे मीच सांगू शकतो. माझ्या वाट्यालासुद्धा संघर्ष आला हे सत्य आहे. चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी मी खूप मेहनत केली. लोकांनी मला ओळखण्यापूर्वी आठ वर्षं मी खूप संघर्ष केला.' स्टारकिड्सविषयी ते पुढे म्हणाले, 'मला तसा अनुभव आला नसला तरी, इंडस्ट्रीत इतरांबाबत त्या गोष्टी झाल्या नाहीत असं मी म्हणणार नाही. इतरांपेक्षा स्टारकिड्सना लवकर संधी मिळते. कारण ते विशिष्ट कुटुंबातून आलेले असतात. मला कधीच सहज संधी मिळाली नाही. पण, मला कुणी थांबवलंसुद्धा नाही. तुम्ही आठ वर्षांनी मोठे कलाकार व्हा किंवा आठ दिवसांनी, जर तुमच्याकडे प्रतिभा नसेल तर तुम्ही या इंडस्ट्रीत टिकू शकत नाही. प्रेक्षक खूप सुजाण आहे. त्यांना बरोबर माहीत असतं की कोण प्रतिभावान आहे आणि कोण नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZHz7qg