Full Width(True/False)

रिया चक्रवर्तीचे बोल्ड फोटो वापरणाऱ्या चॅनलवर भडकली गायिका

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीने जेव्हा पासून तिची बाजू मांडली. बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींनी तिला समर्थन दिलं आहे. या सर्व सेलिब्रिटींच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी कोणताही निर्णय होण्यापूर्वी कोणाबद्दलही चुकीचं मत बनवू नये. आता प्रसिद्ध गायिका हिनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोना मोहपात्रा ही बॉलिवूडमधील त्या सेलिब्रिटींपैकी एर आहे जी सामाजिक- राजकीय मुद्यांव्यतिरिक्त बॉलिवूडशी संबंधित अनेक गंभीर मुद्द्यांवर आपलं मत मांडते. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात विरोधात प्रसारित होत असलेल्या मीडिया रिपोर्टवर सोना मोहपात्राने आपला संताप व्यक्त केला. यासोबतच तिने रियाचा बिकिनी फोटो वापरण्यावरही आक्षेप घेतला. सोना मोहपात्राने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबद्दलचा संताप व्यक्त केला. तिने ट्वीटमध्ये लिहिले की, 'मृत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे आणि न्यायाची मागणी केली गेली पाहिजे. याशिवाय परिस्थिती या व्यवस्थेच्या वर नसतात. व्यवस्थेवर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाहीये. असं असतानाही रियाचे बिकिनीतले फोटो दाखवणं किंवा तिला विश- कन्या म्हणणं हे किती योग्य आहे. इतर अपमानजनक नावांनी हाक मारणं योग्य आहे का?' सोनाने सोशल मीडिया यूझरच्या एका ट्वीटला उत्तर देताना आपलं म्हणणं मांडलं. सध्या सोनाचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचे चाहते आणि इतर सोशल मीडिया यूझर आपआपली मतं यावर मांडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने मुलाखत दिली होती. यात तिने अनेक खुलासेही केली होते. तिच्या या मुलाखतीनंतर अभिनेत्री मिनीशा लांबा, टीव्ही अभिनेत्री हिना खान यांच्यासह अनेकांनी रियाला पाठिंबा दिला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hYFaxY