मुंबई: अभिनेत्री विरुद्ध शिवसेना असं सुरू झालेलं शाब्दीक युद्ध थांबण्याची चिन्ह नाहीत. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केल्यानंतर पोलिकेनं कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा पाडला. आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता गृहमंत्री यांनी कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शन संदर्भात चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शसंदरर्भात खुलासा करण्यासाठी पोलिस संरक्षण मागणाऱ्या कंगनाचीच आता ड्रग कनेक्शन संदर्भात चौकशी होण्याची शक्यता आहे. अभिनेता शेखर सुमनचा मुलगा अभिनेता यानं एका मुलाखतीदरम्यान कंगना देखील ड्रग्ज घेत होती, असा दावा केला होता. सुमारे चार वर्षापूर्वीची अध्ययनची ही मुलाखत आहे. कंगना आणि अध्ययन एकमेकांना डेट करत होते. त्यादरम्यानचा हा किस्सा त्यानं सांगितला होता. ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अध्ययन सुमनने चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने आपल्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययनने केला आहे. या मुलाखतीत अध्ययन म्हणतो की 'मी हॅश ट्राय केलं होतं, पण ते आवडलं नव्हतं, त्यामुळंच मी कोकेन घेण्यास देखील नाही म्हटलं होतं. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळंच कंगनाचं आणि माझं मोठं भांडणही झालं होतं' असं अध्ययननं म्हटलं होतं. याबाबत 'नवभारत टाइम्स'ने अध्ययनशी संवाद साधला. मात्र, या गोष्टीला अधिक महत्त्व न देण्याची विनंती त्याने 'नवभारत टाइम्स'कडे केली. सकारात्मक दृष्टीकोण घेऊन मी पुढे जात आहे, असं अध्ययनने म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, अशा पार्ट्यांमधून आपण नेहमीच लांब राहिलो आहे, असं त्यांनी यापूर्वी कबूल केल्याचं 'नवभारत टाइम्स'ने म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कंगनासोबत सुरू असलेल्या वादाला शिवसेनेने पूर्ण विराम दिला आहे. आमच्यासाठी कंगना एपिसोड संपला आहे. आमच्याकडे आणखीही कामं आहेत, असं प्रवक्ते यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कंगनाप्रकरणावरून चौफेर टीका होऊ लागल्याने शिवसेना बॅकफूटवर आल्याचं बोललं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FqyoT4