Full Width(True/False)

...म्हणून अक्षय कुमार हत्तीच्या विष्ठेचा चहा सहज प्यायला

मुंबई- हा बॉलिवूडचा 'खिलाडी' आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. त्याला स्टंट करायला प्रचंड आवडतात. आणि त्याला धमक्या देऊनही खेळायला खूप रस आहे. जेव्हा अक्षयने तो इन टू द वाइल्ड विथ बिअर ग्रिल्ससोबत शो करणार आहे हे सांगितलं होतं, तेव्हापासूनच खिलाडी कुमारच्या चाहत्यांना या शोची उत्सुकता होती. नुकताच या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यात तो हत्तीच्या विष्ठेचा चहा पिताना दिसत आहे. अक्षयच्या वाढदिवसा दिवशी त्याची 'बेल बॉटम' स्टार हुमा कुरेशी आणि शोचे होस्ट बीअर ग्रील्स यांनी इन्स्टा लाइव्ह केलं. यादरम्यान अक्षयने बर्‍याच रंजक गोष्टी सांगितल्या. अक्षयने असा साजरा केला स्वतःचा वाढदिवस अक्षय कुमारने लॉकडाउन उठल्यानंतर त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. १० सप्टेंबर रोजी त्याने इन्स्टा लाइव्ह करून आपला वाढदिवस साजरा केला. या लाइव्ह सेशनमध्ये त्याच्यासोबत बिअर ग्रील्सदेखील होता. यादरम्यान अक्षयने अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली. अक्षय कुमारने सांगितलं की वाढदिवसाच्या दिवशी तो कुटुंबासोबत छोटेखानी पिकनिकला गेला होता. सांगितलं कसा प्यायला हत्तीच्या विष्ठेची चहा यावेळी हुमाने अक्षयला विचारले की प्रोमोमध्ये तो हत्तीच्या विष्ठेचा चहा पिताना दिसत आहे. बिअर ग्रिल्सने त्याला असं करण्यास कसं पटवलं? यावर अक्षय कुमारने स्पष्टीकरण देताना म्हणाला की, अनेक वर्ष तो गोमुत्र पीत आला होता. त्यामुळे त्याला हत्तीच्या विष्ठेचा चहा पीणं त्याच्यासाठी फारसं कठीण नव्हतं. बेअर ग्रिल्सने सांगितलं त्याला भारतात काय आवडलं- बेअर ग्रिल्सने सांगितलं की शो दरम्यान अक्षय सर्व गोष्टींबाबत खूप उत्साही होता. तो स्टंट करण्यासाठी आणि धोाका पत्करण्यासाठीही तयार होता. यावेळी बेअर म्हणाला की त्याला भारत खूप आवडला. इथले लोक आणि त्यांचं प्रेम आकर्षित करणारं आहे. ग्रिल्सने मिरची, हवामान आणि मैत्रीचंही कौतुक केलं. या लाइव्ह दरम्यान रणवीर सिंहनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच त्याची मिशी फार सुंदर दिसते असंही तो म्हणाला. यावर उत्तर देताना अक्षयने सांगितलं की, त्याच्या कुटुंबियांना ही मिशी अजिबात आवडली नाही. पण सिनेमाची गरज म्हणून ती ठेवली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Zq8zcQ