Full Width(True/False)

'पोलिसांनी मराठीत लिहिलेल्या जबाबावर जबरदस्ती घेतली साइन'

मुंंबई- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचे केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी अजून एक धक्कादायक दावा केला आहे. विकास यांच्या मते, सुशांतच्या कुटुंबियांवर मुंबई पोलिसांनी सक्ती केली. सुशांतच्या कुटुंबियांना मराठीत लिहिलेल्या जबाबावर सही करण्यास भाग पाडले गेले. त्या जबाबात काय लिहिलं गेलं याची कुटुंबाला कल्पना नाही. कुटुंबाने घेतला होता आक्षेप विकास सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषद बोलावली होती. यात त्यांनी सांगितलं की, 'सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्या असल्याचं कुटुंबाने कधीही म्हटलं नाही. मुंबई पोलिसांनी त्यांचं निवेदन मराठीत नोंदवून घेतलं. लिहू नये असा या परिवाराने आक्षेप घेतला होता, परंतु पोलिसांनी संपूर्ण विधान मराठीत नोंदवले आणि मग त्यावर सही करून घेतली. त्यामध्ये काय लिहिले गेले आहे याची कुटुंबाला कल्पना नाही. 'पोलिसांनी यात काय लिहिलं ते आम्हाला ठाऊक नाही' विकास सिंह म्हणाले की, 'हा जबाब कुटुंबासोबत शेअर केलं गेलं नाही, त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्या जबाबात काय लिहिलं हे आम्हाला माहीत नाही.' तसेच विकाससिंह यांनी तो जबाब वाचला का असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं की, 'जबाब मराठीत लिहिलेला असल्यामुळे आम्हाला कळलं नाही. ते मराठीत वाचून दाखवत होते. पण जर ती भाषाच मला येत नाही तर मला कळणार कसं की ते नक्की काय बोलत आहेत. जर मला मराठी येत नाही तर मी कसं पडताळून पाहू शकेन की जे ते बोलत आहेत तेच लिहिलेलंही आहे.' 'आता हे खुनाचं प्रकरण दिसत आहे' विकाससिंह यांनी सुशांतच्या कुटूंबावर कोणाबद्दल शंका आहे का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एफआयआरनंतर ज्या प्रकारे गोष्टी उघडकीस आल्या आहेत, त्यानंतर कुटुंबाचा असा संशय आहे की हे खूनाचे प्रकरणदेखील असू शकते. परंतु आम्ही याला चौकशीचा विषय मानतो आणि आम्हाला आशा आहे की या खटल्याचा योग्य पद्धतीने तपास करेल. १४ जून रोजी मृत्यू, २५ जुलैला एफआयआर याचा १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी मृतदेह सापडला होता. यानंतर सुशांतच्या वडिलांनी २५ जुलै रोजी पाटण्यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. यात आत्महत्येला प्रवृत्त करणं, पैसे हडपणे, ओलीस ठेवणे यासारखे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणाचा प्रथम तपास मुंबई पोलिसांनी केला नंतर पाटणा पोलिसही त्यात सहभागी झाले. मात्नंर अनेक वादानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lFxov7