Full Width(True/False)

भार्गवी चिरमुले जिजाबाईंच्या भूमिकेत; 'हा' अभिनेता साकारणार शहाजीराजेंची भूमिका

मुंबई :'' ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. अभिनेत्री आता जिजाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. मालिकेत शहाजीराजांना बंगळूर प्रांतात जावं लागल्याचा भाग दिसत असून, जिजाऊ आता शिवबांना घेऊन पुण्यामध्ये आल्या आहेत. आता यापुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्याच्या बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा देदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून, मालिकेत प्रेक्षकांना यात नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री भार्गवी चिरमुले टीव्हीवर कधी दिसणार याची तिचे चाहते वाट पाहत होते. आपल्या भूमिकेबाबत भार्गवी म्हणाली, की 'एक आदर्श माता म्हणून ज्यांचं अभिमानानं नाव घेतलं जातं, अशी व्यक्तिरेखा मला साकारायला मिळतेय याचा आनंद आहे. मालिका आता वेगळ्या वळणावर आहे. त्याच वेळी मला त्याचा एक भाग होता आलंय ही भावना सुखावणारी आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळतंय याचा मला अभिमान आहे.' भार्गवीसह मालिकेत शहाजीराजेंच्या भूमिकेत शंतनु मोघेसुद्धा दिसणार आहे. तर शिवबांच्या भूमिकेत दिवेश मेडगे हा बालकलाकार दिसणार आहे. दिवेशने या आधी 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत छोट्या संभाजींची भूमिका साकारली होती. भार्गवी बऱ्याच काळानंतर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. राजमाता म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती! ‘हळवी आई’ आणि ‘कणखर राज्यकर्ती’ अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठता कायम राखली आहे. जिजाऊंचं पुण्यातलं आगमन हे स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचं पाऊल. शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती.महत्त्वाच्या घडामोडींच केंद्र ठरलेल्या पुण्यातील या घटनांचे चित्रण आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून पाहायला मिळणार आहे. पुण्याच्या वेशीवर पहार उखडणे, सोन्याच्या नांगराने नांगरलेली जमीन, पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना, लालमहालाची बांधणी यातलं नेमकं काय काय पाहायला मिळणार याबाबतची उत्सुकता आगामी येणाऱ्या काही भागातून उलगडली जाणार आहे. या मालिकेतील यांचं पात्र कशा प्रकारे रंगविले जाईल याची उत्सुकतादेखील आहेच


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gW4L9o