Full Width(True/False)

अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना करोनाची लागण

मुंबई: लॉकडाऊनंतर सिनेसृष्टीतील काम पुन्हा सुरू झालं असलं तरी अडचणी वाढताना दिसत आहे. मालिकांच्या शूटिंग दरम्यान अनेक कलाकारांनी करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील मुख्य अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना देखील करोनीची लागण झाल्याचं समोर आलं आहे. निवेदिता यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. निवेदिता यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसल्यानं त्या घरीच क्वारंटाइन झाल्या आहेत. निवेदिता यांना करोनाची लागण झाल्याचं कळताच सेटवरी इतर कलाकारांनी देखील कोव्हिड चाचणी करण्यात आली. . तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या मुख्य कलाकारांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.निवेदिता या पूर्ण बऱ्या झाल्यानंतरच त्या मालिकेच्या शूटिंगमध्ये सहभागी होतील, मात्र दोन दिवसांनी मालिकेचं शूटिंग पुन्हा सुरू होईल, असं निर्मात्यांनी म्हटलं आहे. दरम्यान,ज्येष्ठ अभिनेत्री यांच्या निधनाचा नाट्य-चित्रपटसृष्टीसह रसिकांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर हतबलता, खंत, संताप व्यक्त होत आहे. एका संवेदनशील उत्कृष्ट कलाकाराचा असा करोनामुळं शेवट अनपेक्षित असल्याची भावनाही अनेकांनी मांडली. ज्येष्ठ कलाकारांनी खरोखरच एवढा धोका पत्करण्याची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/364C2gH