नवी दिल्लीः HMD Global ने भारतात आपला लेटेस्ट हँडसेट साठी प्री बुकिंग सुरू केली आहे. नोकिया सी ३ ला अधिकृतपणे नोकिया शॉपवरून प्री ऑर्डर केले जावू शकते. २ जीबी रॅमच्या नोकिया सी ३ ची किंमत ७ हजार ९९ रुपये आहे. तर ३ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः नोकिया सी ३ देशात नॉर्डिक ब्लू आणि सँड या दोन रंगात प्री बुकिंगसाठी उपलब्ध आहे. नोकिया सी ३ ला देशात १७ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. वाचाः ची किंमत नोकिया सी ३ मध्ये ५.९९ इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३ जीबी रॅम पर्याय देण्यात आले आहे. तसेच ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनमध्ये १.६ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. फोन अँड्रॉयड १० वर काम करतो. वाचाः वाचाः हँडसेटमध्ये फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी चाहत्यांसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 3040mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः नोकिया ५.३ चे नवीन व्हेरियंट नोकिया ५.३ चे नवीन व्हेरियंट भारतात आले आहे. फोनला सँड कलरमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. नोकिया ५.३ चे ४ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहेच तर ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. नोकिया ५.३ मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FsQqnC