Full Width(True/False)

पाकिस्तान सरकारमुळे नाही तुटणार कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली

मुंबई- पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ऐतिहासिक इमारतींच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आणि यांची वडिलोपार्जित घरं विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कलाकारांच्या घरांची दुरावस्था झाली असून ते कधीही मोळकळीला येऊ शकतात. म्हणूनच खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या पुरातत्व विभागाने राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेल्या या दोन इमारती विकत घेण्यासाठी निधी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज कपूर यांचं घर अर्थात कपूर हवेली आणि दिलीप कुमार यांचं घर पेशावर शहरात आहेत. पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुस समद खान यांनी याबद्दल बोलताना स्पष्ट केलं की, 'फाळणीच्या अगोदर भारतीय सिनेमांचे श्रेष्ठ कलाकार ज्या ठिकाणी जन्मले आणि वाढले त्या ऐतिहासिक वास्तूंच्या किंमती निश्चित करण्यासाठी पेशावरचे उपायुक्त यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे.' १०० वर्ष जुनं आहे दिलीप कुमार यांचं घर राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर कपूर हवेली म्हणून ओळखली जाते. ही हवेली किसा खवानी बाजारात आहे. राज कपूरचे आजोबा दिवाण बेश्वरनाथ कपूर यांनी १९१८ ते १९२२ या काळात बनवले होते. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक यांचा जन्म याच घरात झाला होता. अभिनेते दिलीप कुमार यांचं घरही याच भागात असून सुमारे १०० वर्ष जुनं आहे. कुमार यांचं घर मोडकळीला आलं आहे. २०१४ मध्ये तत्कालीन नवाज शरीफ सरकारने त्याला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते. खान म्हणाले की या दोन्ही ऐतिहासिक इमारतींच्या मालकांनी हे बांधकाम तोडून तिथे प्लाझ्मा, मॉल यांसारख्या वास्तू बांधण्याचा प्रयत्न केला. पण असे सर्व प्रयत्न थांबवण्यात आले. याचं मुख्य कारण म्हणजे पुरातत्व विभागानुसार या वास्तूंना ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे त्यांना जतन करणं गरजेचं आहे. मात्र कपूर हवेलीचे मालक अली कादर यांनी त्यांना ही हवेली कधीच पाडायची नव्हती असंही स्पष्ट केलं. या ऐतिहासिक वास्तूचं रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा संपर्क साधला असा दावा अली यांनी केला. इमारतीच्या मालकांनी ती इमारत सरकारला विकण्यासाठी २०० कोटींची मागणी केली आहे. २०१८ मध्ये, पाकिस्तान सरकारने राज कपूर यांच्या हवेलीला संग्रहालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तसं होऊ शकलं नाही. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जवळपास ३० हजार जुन्या ऐतिहासिक इमारती आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iedUuk