Full Width(True/False)

इरफान खानच्या कबरीवर वाढलं होतं रान, मुलाने वाहिली फुलं

मुंबई- अलीकडेच सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या कबरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या कबरीजवळ वाढलेलं रान पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होता. आता सोशल मीडियावर इरफानच्या कबरीचे नवीन फोटो त्यांचा मुलगा बाबिलने शेअर केले आहेत. यात त्याचा छोटा भाऊ कबरी जवळची जागा स्वच्छ करून तिथे नवीन फुलं वाहताना दिसत आहेत. बाबीलने त्याच्या इन्स्टाग्रामवरून वडील इरफान यांच्या कबरीचे नवीन फोटो शेअर केले. यात त्याच्या कबरीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ केलेली दिसत आहे. तर भाऊ अयान कबरीवर पाण्याचा शिडकावर करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना बाबिलने लिहिले की, 'बाबांना हे जंगल फार आवडायचं. कबरीजवळ वाढलेलं गवत पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती तेव्हा आईने या कबरीच्या सभोवतालच्या जंगलांविषयी लिहिलंही होतं.' काही दिवसांपूर्वी अभिनेता चंदन रॉय इरफान खानच्या कबरीजवळ गेला होता. यावेळी त्याने तिथला एक फोटोही शेअर केला होता. त्या फोटोत इरफानच्या कबरीची अवस्था पाहून चाहत्यांना फार वाईट वाटलं होतं. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या कबरेची ही अवस्था पाहून प्रत्येकजण निराश झाला होता. चंदनने कबरीचे फोटो शेअर करत म्हटलं होतं की, 'कालपासून इरफानची आठवण येत होती. स्वत: वरच नाराज होतो की चार महिन्यात मी त्याच्या कबरीजवळ एकदाही जाऊ शकलो नाही. आज मी गेलो, तो तिथे एकटाच आराम करत होता. आजूबाजूला कोणी नव्हतं, तिथे फक्त झुडूपं होती आणि शांतता होती. मी त्याच्यासाठी तिथे रजनीगंध ठेवला आणि त्याचा आशीर्वाद घेऊन परत आलो.' बाबिलने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'इरफान यांना नेहमीच झाडं- झुडूपं यांच्या सानिध्यात रहायला आवडायचं. तिथून कचरा आणि प्लॅस्टिकसारखे अनैसर्गिक गोष्टी काढून टाकण्यात आल्या आहेत.' बाबीलने यावेळी आई सुतापाने लिहिलेल्या गोष्टी शेअर केल्या आणि लिहिले की, 'महिलांना मुस्लिम स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही, नाहीतर मी रातराणीचं रोप तिकडे नक्कीच लावलं असतं.' सुतपा यांनी पुढे लिहिले की- 'ती जागा माझी आहे, जिथे मी तासन् तास कोणत्याही अडथळ्याशिवाय बसू शकते. त्याचा आत्मा तिथेच आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या कबरीकडे दुर्लक्ष केलं जाईल. परंतु सद्यस्थितीत पावसामुळे रान वाढतं. तुम्ही ज्या फोटोबद्दल बोलत आहात त्यातलं गवत मला सुंदर वाटलं. पाऊस पडतो रान वाढतं आणि पुढच्या ऋतूत ते रान सुकूनही जातं. त्यानंतर ते साफ केलं जातं. प्रत्येक गोष्ट जशी परिभाषित केली आहे तसंच होणं गरजेच आहे का? हे वाढलेलं रान कोणत्यातरी कारणासाठीच वाढलं असेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HFuuHc