Full Width(True/False)

सई लोकूरनं चाहत्यांना घातलं प्रेमाचं कोडं; खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री हिनं चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. सईने खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. सईनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोच्या खाली कॅप्शन लिहिताना सईनं प्रेमात असल्याचं म्हटलं आहे. पण यात तिनं नक्की कोणाच्या प्रेमात आहे, हे मात्र चाहत्यांना कळू दिलं आहे. शेअर केलल्या फोटो सईनं खास व्यक्तीचा चेहरा मात्र दाखवला नाहीए, त्यामुळं सई नक्की कोणाच्या प्रेमात आहे? याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात असताना सईच्या लव्ह लाइफबद्दल तिनं खुलासे केले होते. तसंच आणि सई लोकूर यांच्यात 'कुछ तो गडबड है' अशी चर्चाही रंगली होती. झाली आहे. 'बिग बॉस'च्या घरात दोघांचं चांगलं जमत होतं. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वावरताना दिसलेली. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं, सईच्या मनोरंजनासाठी पुष्करनं आयटम नंबरवर डान्स करणं किंवा जेवणावेळी पुष्करच्या ताटात सईनं जेवण करणं. त्यावर घरातल्या इतर सदस्यांनी 'प्यार बाटने से बढता है' म्हणत दोघांची टर उडवणं. या प्रसंगांतून दोघांमधील मैत्रीचं नातं आता नवीन वळण घेतं की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30kQWMi