मुंबई टाइम्स टीम टीव्ही विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा मानला जाणारा 'एमी पुरस्कार' सोहळा अलीकडेच पार पडला. जगातील सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज, लिमिटेड सीरिज आणि टीव्ही चित्रपट यांचा या पुरस्कारांमध्ये समावेश होता. जिमी किमेल या जगप्रसिद्ध सूत्रसंचालकानं ७२व्या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. हा पुरस्कार सोहळा १४ ते १९ सप्टेंबर असा पाच दिवस चालला होता. यंदाचा एमी पुरस्कार सोहळा इतिहास रचणारा ठरल्याचं बोललं जातंय. '', '' या सीरिज आणि चित्रपटातून गाजलेली अभिनेत्री झेनडायाला तिच्या '' या सीरिजमधील अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या 'रुई' या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कर मिळाला आहे. अवघ्या २४ वर्षाची असलेली झेनडाया ही एमी पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण अभिनेत्री असून, यामुळेच यंदाचा एमी पुरस्कार सोहळा ऐतिहासिक ठरल्याचं सांगितलं जातं. ऑनलाइन पार पडलेल्या या सोहळ्यात झेनडायाला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांचा आणि तिचा उत्साह, आनंद बघण्यासारखा होता. झेनडायानं आपल्या करिअरला 'शेक इट अप' डिस्नीच्या सीटकॉमपासून सुरुवात केली आहे. सध्या ती 'डुन' आणि 'माल्कम अँड मारी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...अँड एमी गोज टू सर्वोत्कृष्ट अभिनेता लिमिटेड सिरीज - मार्क रफेलो (वॉचमेन) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लिमिटेड सिरीज - रेजिना किंग (वॉचमेन) सर्वोत्कृष्ट अभिनेता - जेरेमी स्ट्रॉंग (सक्सेशन) सर्वोत्कृष्ट लिमिटेड सीरिज - वॉचमेन सर्वोत्कृष्ट कॉमेडी सीरिज - शिट्ट्स क्रीक सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज - सक्सेशन हे सगळं माझ्या कल्पनेकपलीकडचं आहे. यावेळी व्यक्त कसं व्हायचं हे मला कळत नाहीय. त्या क्षणी मी माझ्या कुटुंबासोबत होते आणि त्यांचा तो आनंद, उत्साह माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. हा क्षण फार भावनिक आहे. मी कधीही उगाच रडले नाही. पण, या क्षणी मी माझे अश्रू आवरु शकले नाही. हे सगळं घडलंय यावर विश्वास बसायला काही सेकंद लागले. पण माझं एक स्वप्न पूर्ण झालंय. प्रेक्षक आणि माझ्या सर्व मार्गदर्शकांचे आभार. -झेनडाया, रुई (यूफोरिया) एमी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cuQDTR