Full Width(True/False)

shraddha kapoor live: चौकशीसाठी श्रद्धा कपूर एनसीबी कार्यालयात दाखल

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थांसंबंधी शुक्रवारी अभिनेत्री राकूलप्रीत सिंहची चौकशी करण्यात आली. नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तिच्यासह दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिश्मा प्रकाश हिलाही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. आज दीपिका पदुकोण ,श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. श्रद्धा कूपर चौकशीसाठी फोर्ट इथल्या एनसीबी कार्यालयात पोहोचली असून तिची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पाहा लाइव्ह अपडेट्स.... का होत आहे श्रद्धाची चौकशी? अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा विषय समोर आल्याने त्यासंबंधीचा तपास एनसीबीकडून होत आहे. त्यातच सिनेतारकांचे व्यवस्थापन करणाऱ्या एका एजन्सीशी संबंधित असलेली जया शाह ही रियाशी अमली पदार्थांसंबंधी संपर्कात होती. सुशांतला अमली पदार्थांची मात्रा कशी द्यावी, याबाबत रिया आणि जया यांच्यातील मेसेज संभाषण तपास संस्थेच्या हाती लागले आहे. त्यावरूनच एनसीबीने जया शाह हिची बुधवारी चौकशी केली. एनसीबीतील सूत्रांनुसार, रियाच्या चौकशीत जी नावे समोर आली होती, त्यांची उलट तपासणी जयाकडून करण्यात आली. त्यामध्ये दोघांनी घेतलेली नावे सारखीच असल्याचे दिसून आले. यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच आता काही सिनेतारकांना समन्स बजाविण्यात आले आहे. श्रद्धा कपूरला विचारले जातील पुढील प्रश्न: - २८ मार्च २०१९ रोजी सुशांतच्या गेस्ट हाऊसवर 'छिछोरे'ची सक्सेस पार्टी झाली होती? - त्या पार्टीत ड्रग्ज घेतले गेले होते का? - तूही ड्रग्ज घेतेस का? - तुला ड्रग्ज घेण्याची सवय आहे की कधीकधी घेतेस? - रियाने तुझ्याविरोधात विधान दिलं आहे, यावर तुझं काय म्हणणं आहे? - सुशांतसोबत तू किती वेळा ड्रग्ज घेतलेस? - जया साहाला तू कधीपासून ओळखतेस? - तू सीबीडी ऑइल घेतेस का? - सारा आणि रियासोबत ड्रग्ज घेतले का? पाहा व्हिडिओ: सीबीडी तेलाची ऑर्डर या सर्व पार्श्वभूमीवर एनसीबी दीपिका पदुकोण, सारा अली खान, व राकूल प्रीत सिंह यांची चौकशी करत आहे. मंगळवारी झालेल्या चौकशीत एनसीबीनं जया साहाला तिच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटबद्दल विचारले. या चौकशीत जया साहानं मान्य केलं की तिनं श्रद्धा कपूरशिवाय सुशांतसिंह राजपूत, , निर्माता मधु मंटेना आणि स्वत: साठी सीबीडी तेलाची ऑनलाईन ऑर्डर दिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/340yaKX