Full Width(True/False)

चित्रपट किंवा मालिकेच्या चित्रीकरणावेळी नियम न पाळल्यास होणार 'ही' कारवाई

म. टा. प्रतिनिधी, राज्य सरकारने घालून दिलेले नियम चित्रीकरणावेळी न पाळल्यास अशा निर्मात्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने घेतला आहे. याशिवाय बंद करण्याचा इशाराही महामंडळाने दिला असून नियम पाळले जातात की नाही हे पाहण्यासाठी महामंडळाने भरारी पथके नियुक्त केली आहेत. अनलॉक जाहीर करताना काही नियम व अटी घालत राज्य सरकारने चित्रीकरणासाठी परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात नियम पाळत चित्रीकरण झाले. नंतर मात्र नियम धाब्यावर बसवत चित्रीकरण सुरू आहे. यामुळे अनेकांना करोनाची बाधा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सातारा येथे एका मालिकेच्या चित्रीकरणावेळी २७ जणांना करोनाची लागण झाली. ज्येष्ठ अभिनेत्री यांचा त्यामुळे बळी गेला. या पार्श्वभूमीवर चित्रीकरणस्थळावर कडक नियम पाळले जावेत यासाठी चित्रपट महामंडळ पुढे सरसावले आहे. चित्रीकरण करताना निर्मात्यांनी व टिमने नियम मोडल्यास त्यांच्या विरोधात महामंडळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवणार आहे. याशिवाय महामंडळच अशा ठिकाणचे चित्रीकरण बंद करणार आहे. नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी महामंडळाने भरारी पथके नियुक्त केली आहेत. सिनेमा, मालिका, वेबसिरीज यासह सर्व प्रकारच्या चित्रीकरणावर आता महामंडळाची नजर राहणार आहे. यासाठी भरारी पथके प्रत्यक्ष चित्रीकरणस्थळी भेट देण्याबरोबरच कलाकार व तंत्रज्ञांशी संपर्क साधणार आहेत. सतत संपर्क साधत चित्रीकरणावेळी नियम पाळले जातात की नाही यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सरकारने पुन्हा चित्रीकरणावर बंदी घालू नये यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी महामंडळाने भरारी पथके नियुक्त केली आहेत. नियम न पाळल्यास चित्रीकरण बंद पाडण्यात येईल. -मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34fcf2K