Full Width(True/False)

ट्रोल करताना आई आणि बहिणीच्या नावाचा उद्धार कशाला?; सुनील ग्रोवर भडकला

मुंबई : अभिनेता सध्या त्याच्या '' या नव्या टीव्ही कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. सुनील नेहमीच समाजात घडणाऱ्या गोष्टींवर निर्भीडपणे त्याचं मत व्यक्त करत असतो. त्यामुळे अनेकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील व्हावं लागतं. परंतु, 'अशा ट्रोलर्सकडे मी दुर्लक्ष करतो. मात्र, या ट्रोलिंगमध्ये आई-बहिणींच्या नावाचा उद्धार का होतो?' असा प्रश्न त्यानं विचारलं आहे. करताना अश्लील, नको त्या शब्दांचा प्रयोग कशाला? असा प्रश्न त्यानं ट्रोलर्सना विचारला आहे. तो म्हणतो, की 'मी ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतो. कारण हे सोशल मीडिया आहे आणि इथे ट्रोलिंग होतच राहणार. यात मला फक्त लोकांच्या कमेंट्स पाहायला मिळतात. त्या लोकांना मी वैयक्तिकरित्या ओळखत नसतो. त्यामुळे मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. ट्रोलिंग केल्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही माझ्याविषयी कोणतं मत मांडता याबद्दल मला काहीच वाटत नाही. कारण प्रत्येक जण त्यांची मतं नोंदवत असतो. आपण कितीही काही सांगायचा प्रयत्न केला, तरी लोकं तुम्हाला खोटंच ठरवणार आहेत. मात्र हे खरंच फार नकारात्मक आहे. अनेक जण फेक अकाऊंटवरुन ट्रोलिंग करतात. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, जर तुम्हाला माझं काम आवडलं नाही, तर तुम्ही थेट सांगा. पण प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगताना आई आणि बहिणीच्या नावाचा उद्धार का होतो? त्यांच्यावरुन शिवी का दिली जाते?' असा सवाल त्यानं सर्वांना विचारला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शिंदे टीव्हीवर कमबॅकची तयारी करत होती. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर शिल्पा पुन्हा एकदा टीव्हीवर येत होती ती, 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' या कॉमेडी शोच्या निमित्तानं. मात्र, आता वेगळीच बातमी हाती येतेय. ती म्हणजे, शिल्पा हा कार्यक्रम सोडणार असल्याचं कळतंय. शो सोडण्यामागचं कारण म्हणजे, 'निर्मात्यांच्या कामावर खुश नाही', असं तिनं म्हटलं आहे. एका मुलाखतीत शिल्पा सांगते, की 'निर्माते सातत्यानं कलाकारांशी खोटं बोलत आहेत. सुरुवातीला, आम्हाला आठवड्यातून फक्त दोन दिवस काम करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. पण, आता आमच्याकडून १२-१२ तास काम करुन घेतलं जात आहे. या शोच्या केंद्रस्थानी सुनील ग्रोव्हर आहे. आम्ही फक्त मागे उभं राहून टाळ्या वाजवण्याचं काम करत आहोत. इतक्या दिवसांत मला स्क्रिप्टदेखील मिळाली नाही. अशा शोमध्ये मी दीर्घ काळ काम करु शकत नाही. निर्मात्यांनी मला फसवलं आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे.'असंही शिल्पानं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3571WA3