मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंड हिनं अनेक वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, तसंच तिच्या भावना व्यक्त केल्या. इतकंच नाही तर सुशांतच्या कुटुंबियांच्या बाजूनं उभ राहणार असल्याचं सांगितलं. सुशांतच्या निधनानंतर पुन्हा एकदा अंकितासोबतच्या त्याच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.दोघांचे जुने फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. अशीच एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतेय. सुशांत आणि अंकितच्या फोटोचा वापर करून एक व्हिडिओ तयार करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्लिप वापरण्यात आलीए. काही दिवसांपूर्वी अंकितानं एका मुलाखतीत सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. सुशांतला शेवटचा काय मेसेज द्यायचाय, या प्रश्नावर बोलताना अंकिता भावुक झाली होती. ' मी केवळ एवढंच म्हणेन की, सुशांत तुझ्यावर प्रेम करणारे खूप जणं आहेत, संपूर्ण देश तुझ्या बाजुनं उभा आहे. हात पुढं करून त्याला बोलवायचंय आणि त्यानं पुन्हा यावं', असं अंकितानं म्हटलं आहे. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर अंकिता देखील या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं सुशांतसाठी अनेक पोस्ट शेअर केल्यात, त्यामुळं तिचा आणि यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा केवळ अफवा असल्याचं तिनं एका मुलाखतीतल म्हटलं आहे. मी विकीला डेट करतेय, आणि त्याच्यासोबत खूष आहे, असंही अंकितानं स्पष्ट केलं आहे. कधी सुटणार हे कोडं? दोन महिन्यापूर्वी म्हणजेच १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता याचा मृत्यू झाला. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी देशात इतकंच नाही तर परदेशातही त्याच्या मृत्यूची चर्चा होताना दिसतेय.१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानं आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं होतं. परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या, असं असलं तरी सुशांतचा मृत्यून नेमका कसा झाला याचं कोडं आजही उलगडू शकलं नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/358nPiv