मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता मृत्यू प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणात ड्रग्जचाही एक अँगल पुढं आला आहे. ड्रग्ज रॅकेटशी सुशांतची गर्लफ्रेंड संबंध असल्याचं एनसीबीचं म्हणणं आहे. सध्या रिया चक्रवर्ती ऑर्थर रोड तुरुंगात आहे. नुकतीच तिची न्यायालयीन कोठडीही वाढवण्यात आली आहे. जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु एसबीबीनं मात्र रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेत जामिनाला विरोध केला आहे. रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती व अन्य आरोपींच्या जामीन अर्जांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. अमली पदार्थांची प्रकरणे ही हत्या किंवा सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणांपेक्षाही गंभीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं होतं, कारण हत्येसारख्या प्रकरणात एक व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबावर परिणाम होतो, पण अमलीपदार्थांच्या प्रकरणांनी संपूर्ण समाजावर परिणाम होतो. एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केला युक्तिवाद केला आहे.एनसीबीने रियाच्या जामिन अर्जावर आक्षेप घेतल्यानं तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एनसीबीला अधिकार नाही 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) माझ्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकारच मुळात या तपास यंत्रणेला नाही. कारण अमली पदार्थांचे प्रकरण हे अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित असल्याचे एनसीबीचं म्हणणे आहे आणि सुशांतच्या मृत्यूशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडं सोपवलेला आहे', असा युक्तिवाद आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यातर्फे अॅड. सतीश मानेशिंदे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडला होता. रिया व तिचा भाऊ शौविकतर्फे मानेशिंदे यांनी जामीन अर्ज केले असून, त्यावर न्या. सारंग कोतवाल यांच्यासमोर 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'द्वारे प्राथमिक सुनावणी झाली होती . तेव्हा, 'दोन्ही अर्जांची प्रत आम्हाला अद्याप मिळाली नसून त्यांचा अभ्यास करून प्रतिज्ञापत्रावर सविस्तर म्हणणे मांडू', असं म्हणणं एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मांडलं होतं. तेव्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत हा तपास एनसीबीच्या अधिकारक्षेत्राबाहेर असून त्याविषयीही एनसीबीनं आपल्या प्रतिज्ञापत्रात उत्तर द्यावं, असं अॅड. मानेशिंदे यांनी सुचवलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SlTzsV