मुंबई- रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकऱणात १४ दिवसांची न्यायालयीनन कोठणी देण्यात आली होती. आज मंगळवारी तिची सुटका होईल. प्रकरणातील ड्रग्ज चौकशीत एनसीबीने (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) तिला अटक केली होती. सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीने ८ सप्टेंबर रोजी रियाला अटक केली होती. या प्रकरणात रिया जर दोषी आढळली तर तिला १० वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. १० वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते सुशांत प्रकरणातील चौकशीदरम्यान अटक केलेल्या इतर आरोपींच्या जबाबांच्या आधारे एनसीबीने रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबर रोजी अटक केली होती. भायखळा तुरुंगात रिया १४ दिवस न्यायालयीन कोठडीत होती. या दरम्यान न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज दोन वेळा फेटाळण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी रियाला (एनसीबी) ने कलम ८ (सी), २७ (ए), २९, २० (बी) आणि २८ अंतर्गत अटक केली. या प्रकरणात रिया दोषी आढळल्यास तिला १० वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते. ड्रग्जची देवाण- घेवाण करण्यात मदत केल्याचं तिने मान्य केलं रियाला सुशांतच्या मृत्यू प्रकरणी नव्हे तर ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. रियाने एनसीबीकडे स्वतःचा गुन्हा मान्य केल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. ड्रग्जच्या देवाण- घेवाणीत तिचा हात असल्याचं रियाने मान्य केलं होतं. इतकंच नाही तर रियानेही ती ड्रग पेडलर्सच्या सतत संपर्कात होती हेही मान्य केलं. या कबुली जबाबानंतर रियाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान रियाने फक्त स्वतःचाच गुन्हा कबुल केला नाही तर इतर २५ बॉलिवूड सेलिब्रिटींचीही नावं घेतली. न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज दरम्यान, दंडाधिकारी न्यायालयात रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र येथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. वकिलांनी रियावर दबाब टाकण्यात आल्याचा युक्तीवाद न्यायालयात केला. पण याचा फारसा फायदा झाला नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HjgN0h