Full Width(True/False)

अभिनेत्री आशालता माझ्या गुरुभगिनी, अशोक सराफ यांना तीव्र दुःख

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री यांचं आज निधन झालं. आशालता यांच्या निधनानं मराठी कलाविश्व हळहळलं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आशालता यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते यांनी देखील आशालता माझ्या गुरुभगिनी समान होत्या, असं म्हणत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'गंमत जमात' सारख्या अनेक कार्यक्रमांत अशोक सराफ आणि आशालता यांनी एकत्र काम केलं होतं. ' आम्ही सिनेसृष्टीतल्या कामाला एकत्रच सुरुवात केली. तिला तिच्या पदार्पणासाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आम्ही दोघांनी देखील चित्रपट निर्माते गोपीनाथ सावकर यांच्याकडे काही काळ प्रशिक्षण घेतलं होतं. सावरकर गुरु होते तर आतालता मला गुरुभगिनी समान होत्या, आज मी माझ्या गुरू समान बहिणीला गमावलंय', असं म्हणत अशोक सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'काळूबाईच्या नावानं चांगभलं' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आशालता यांना करोनाची लागण झाली होती. आशालता यांच्यासह काळूबाईच्या सेटवर काम करणाऱ्या २७ जणांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. यांच्यामार्फत करोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशालता यांनी कोकणी व मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी विविध भाषांतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hSoRll