नवी दिल्लीः करोना महामारीत सुद्धा प्रीमियम स्मार्टफोनची जबरदस्त विक्री होत आहे. सीएमआरच्या ताज्या रिपोर्टनुसार, २०२० च्या पहिल्या सहामाहीत भारतीय प्रीमियम मार्केट (२५ हजारांपेक्षा जास्त) मध्ये १८ टक्के वाढ झाली आहे. सर्वात जास्त प्रीमियम फोन सॅमसंगने विकले आहेत. या सेगमेंटमध्ये दक्षिण कोरियाचा ब्रँड ३७ टक्के भागीदारीसह नंबर वन वर राहिला आहे. तर अॅपल २६ टक्क्यांच्या भागीदारीसह दुसऱ्या नंबरवनवर तर चीनी कंपनीचा वनपल्स १५ टक्क्यांसह तिसऱ्या नंबरवर आहे. वाचाः रिपोर्टमध्ये म्हटले की, कोविड महामारी आणि देशात लॉकाडाऊन असूनही प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंट सर्वात कमी नुकसान झाले आहे. पहिल्या सहामाहीत या टॉप ३ कंपन्याचे ओप्पो, रियलमी, आयक्यू मोटोरोला आणि शाओमी यासारख्या कंपन्याचे मार्केट शेयर राहिला आहे. वाचाः प्रीमियम सेगमेंटमध्ये सर्वात जास्त गॅलेक्सी ए७१ ची विक्री रिपोर्टनुसार, प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये (२५ हजार ते ५० हजार या दरम्यान) स्पर्धा वाढली आहे. ओप्पो आणि शाओमी यासारख्या कंपन्या सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. पहिल्या सहामाहीत एकूण स्मार्टफोन सेगमेंटमध्ये ५ टक्के भागीदारी प्रीमियम सेगमेंटमध्ये आहे. १९ टक्के भागीदारी सोबत सॅमसंग गॅलेक्सी ए७१ प्रीमियम सेगमेंटमध्ये सर्वात जास्त विकणारा स्मार्टफोन ठरला आहे. वाचाः गॅलेक्सी ए७१ शिवाय कंपनीचा गॅलेक्सी ए५१ स्मार्टफोनला सुद्धा लोकांची खूप पसंती आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए७१ मध्ये ६.७० इंचाचा डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर 64MP + 12MP + 5MP + 5MP चा रियर कॅमेरा , ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 4500mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः अॅपलही मागे नाही सुपर प्रीमियम सेगमेंट (५० हजार ते १ लाख रुपये किंमत) यात ५६ टक्क्यांसोबत अॅपल नंबर वनवर आहे. अॅपलचा आयफोन ११ ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच एक लाखांच्या वर प्रीमियम सेगमेंटमध्ये अॅपल टॉपवर कंपनी आहे. या रेंजमध्ये अॅपल आयफोन ११ प्रो मॅक्स खरेदी केले आहे. वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ELTZFt