Full Width(True/False)

मुंबईला PoK म्हणणारी कंगना हाथरसबद्दल काय म्हणाली...?

मुंबई: उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये तरुणीवर निर्भयासारखे कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरील नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजिनाम्याची मागणी केली जात आहे. असं असताना मुंबईला पाकव्याप्त काश्मिर म्हणणारी अभिनेत्री हिचं ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. कंगनानं ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास असस्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाला मुंबईला पाकव्याप्त म्हणत मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमिवर कंगनानं घटनेवर केलेल्या या ट्विटची सध्या चर्चा सुरू आहे. नेमकं काय म्हणाली कंगना? मला योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जसं प्रियांका रेड्डीच्या प्रकरणातील दोषींना ज्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला त्या ठिकाणी मारण्यात आलं त्याच प्रमाणं हाथरसच्या पीडितेलाही न्याय मिळायला हवा',असं कंगनानं म्हटलं आहे. तलंच तिनं आणखी एक ट्विट केलं आहे या ट्विटमध्ये तिनं बलात्कार करणाऱ्या नराधमांना भर चौकात सर्वांसमोर गोळ्या मारल्या पाहिजेच, असं म्हटलं आहे. या निरागस आणि निरापराध मुलींसाठी आपण काहीही करू शकलो नाही, अशी खंत तिनं तिच्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे. काय आहे प्रकरण? १९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती, तसंच पाठीचा कणाही मोडला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती. शुद्धीवर आल्यानंतर तिनं न बोलताच आपल्यावर झालेले सगळे अत्याचार इशाऱ्यांतूनच व्यक्त केले. तिच्या अंगावरच्या जखमाच सगळं काही सांगत होत्या. गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती आणि आज तिची ही लढाई अर्धवट राहिली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jfWj6V