Full Width(True/False)

कारमुळं आयुष्य बदलत नसतं पण... विनीत बोंडेच्या घरी आली नवी कार

मुंबई: 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत बोंडे यानं नुकतीच चारचाकी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत हा आनंदाचा क्षण त्यानं चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'कारमुळं आयुष्य बदलत नसतं पण जगण्याचा दृष्टीकोन उंचावतो' असं कॅप्शन देत विनीतनं हे फोटो शेअर केले आहे. विनीतने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील असून दोघांच्या चेहऱ्य़ावरचा आनंद सर्वकाही सांगून जात आहे. विनीतची पत्नी सोनम पवार मूळ सोलापूरची आहे. दोन वर्षांपूर्वी दोघं विविहाबंधनात अडकले होते. विनीतच्या लग्नाला मोजक्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. 'चला हवा येऊ द्या'नंतर विनीत मराठी बिग बॉस या कार्यक्रमातही दिसला होता.मात्र, दुसऱ्याच आठवड्यात तो बेघर झाला होता. कधी लहान मुलगा, कधी पोलिस हवालदार अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये विनीत 'चला हवा येऊ द्या'च्या एपिसोड्समध्ये झळकला होता. विनीतची भूमिका असलेले शहाणपण देगा देवा, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा यासारखे चित्रपट गाजले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3698X3S