Full Width(True/False)

...म्हणून बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज घेतात; राखी सावंतने सांगितलं कारण

मुंबई:अभिनेता प्रकरणात अमली पदार्थ चौकशीच्या जाळ्यात आणखी काही सिनेतारका येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका जया शाहने दिलेल्या माहितीच्या आधारे नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तपास सुरू केला आहे. या प्रकरणात एनसीबीने समन्स बजावलेली अभिनेत्री आणि सारा अली खान यांची उद्या, शनिवारी चौकशी होणार आहे. दरम्यान, राखी सावंत हिनं बॉलिवूडमधील कलाकार का घेतात, त्याचं कारण सांगितलं आहे. एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत राखीनं बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन यासंदर्भात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये ग्लॅमरला सर्वाधिक महत्त्व असून ग्लॅमरसाठी कलाकारमंडळी ड्रग्जचं सेवन करत असल्याचं राखीनं म्हटलं आहे. ग्लॅमर टिकून राहण्यासाठी किंवा वजन वाढू नये साठी कलाकारांना ड्रग्ज सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मलाही काही वर्षापूर्वी वजन कमी करण्यासाठी काही ड्रग्जचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण ड्रग्ज घेतल्यानं भूक लागत नाही. वजणावर नियंत्रण राखलं जातं,असं म्हटलं जातं. परंतु मा ड्रग्ज ऐवजी हॉट योगाची निवड केली. बॉलिवूडमधील कलाकारांना व्यायाम किंवा योग करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी ते वजन कमी करण्यासाठी असल्या शॉर्टकटचा वापर करतात, असं राखी म्हणाली. दरम्यान, अभिनेत्री व सारा अली खानसह चार अभिनेत्रींना नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्युरोने ( ) बजावले आहेत. या सर्व अभिनेत्रींचे व्यवस्थापन करणाऱ्या जया शाह या महिलेची एनसीबीने बुधवारी चौकशी केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे समन्स बजावण्यात आले आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा विषय समोर आल्याने त्यासंबंधीचा तपास एनसीबीकडून होत आहे. त्यातच सिनेतारकांचे व्यवस्थापन करणाऱ्या एका एजन्सीशी संबंधित असलेली जया शाह ही रियाशी अमली पदार्थांसंबंधी संपर्कात होती. सुशांतला अमली पदार्थांची मात्रा कशी द्यावी, याबाबत रिया आणि जया यांच्यातील मेसेज संभाषण तपास संस्थेच्या हाती लागले आहे. त्यावरूनच एनसीबीने जया शाह हिची बुधवारी चौकशी केली. एनसीबीतील सूत्रांनुसार, रियाच्या चौकशीत जी नावे समोर आली होती, त्यांची उलट तपासणी जयाकडून करण्यात आली. त्यामध्ये दोघांनी घेतलेली नावे सारखीच असल्याचे दिसून आले. यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच आता काही सिनेतारकांना समन्स बजाविण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीतून अमली पदार्थांचे जाळे नेमके कसे आहे, याबाबत माहिती काढली जाईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/331wnpT