Full Width(True/False)

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दिया मिर्झाही अडकली, ड्रग्ज पेडलरने घेतलं नाव

मुंबई- सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे बॉलिवूड जगतातील अनेक बड्या नावांचा खुलासा होत आहे. या प्रकरणात आता अभिनेत्री दिया मिर्झाचं नावही समोर आलं आहे. ड्रग्ज पॅडलर अनुज केशवानीने एनसीबीच्या चौकशीत दीया मिर्झाचं नाव घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवानीने आपल्या जबाबात म्हटलं की दियाचा मॅनेजर तिच्यासाठी ड्रग्ज विकत घ्यायचा. यासंबंधीचे पुरावेही त्याने दिले. त्यामुळे आता लवकरच या प्रकरणात दिया मिर्झाला चौकशीसाठी समन्स पाठवू शकते असं म्हटलं जात आहे. दरम्यान, मंगळवारी दीपिका पादुकोणचं नावही ड्रग्ज चॅटमध्ये समोर आलं आहे. सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्यानंतर दीपिकाचं नाव समोर आल्याने साऱ्यांनाच धक्का बसला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि एका टॅलेन्ट मॅनेजमेन्ट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना समन्स बजावले आहेत. चितगोपेकर हे KWAN टॅलेन्ट मॅनेजर एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि करिश्मा प्रकाश ही या एजन्सीची कर्मचारी आहे. सुशांत राजपूतची टॅलेन्ट मॅनेजर जया साहालाही एनसीबीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. यासंबंधी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की चौकशी दरम्यान एनसीबीला या प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी गुंतले असल्याची माहिती मिळाली. एनसीबीने यापूर्वी ज्या लोकांची चौकशी केली होती त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्जसंबंधी माहिती मिळू शकेल असं म्हटलं जात आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत १२ हून अधिक लोकांना अटक केली आहे. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचाही समावेश आहे. तर अनेकांना चौकशीसाठीचे समन्स पाठवण्यात आले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35W5lBY