मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर किती सर्रास केला जातो हे या चौकशीत पुन्हा एकदा समोर आलं आहे. या प्रकरणात आधीच रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर ड्रग पेडलर्सना अटक करण्यात आली आहे. तर आज फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटाचीही एनसीबी चौकशी करत आहे. तर एनसीबीने दोन एफआयआर दाखल केल्या असून ५० सेलिब्रिटींची यादीही तयार केली आहे. एनसीबीने ही यादी ड्रग पेडलर्सच्या चौकशीनंतर तयार केली आहे. एनसीबीने आता करण जोहरच्या टीममधील दिग्दर्शक क्षितीज प्रसाद याला समन्स पाठवला आहे. क्षितीजला शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्याच्यासोबत शुक्रवारी दीपिका पादुकोण आणि करिश्मा प्रकाश यांचीही चौकशी होणार आहे. हिंदी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने धर्मा प्रोडक्शनचा दिग्दर्शक क्षितीज प्रसादला गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण तो दिल्लीत आहे. यामुळे उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्याला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. एनसीबीने दाखल केले दोन एफआयआर एनसीबीने सुशांत प्रकरणात दोन एफआयआर दाखल केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि अमली पदार्थांची देवाण- घेवाण करणाऱ्या ड्रग्ज डीलरला अटक केली आहे. आता एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडची ५० नावं आहेत. असं म्हटलं जातं की यात अनेक ए-लिस्टचे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी-ग्रेड सिनेमांच्या निर्मात्यांचं नाव सामिल आहे. कोणा- कोणाचं नाव घेतलं जया साहाची एनसीबीने जेव्हा चौकशी केली यात दीपिका पादुकोण, सिमॉन खंबाटा आणि करिश्मा प्रकाश यांची नावं समोर आली. तर रकुलप्रीत सिंग आणि सारा अली खान यांची नावं रिया चक्रवर्तीने चौकशीत सांगितली होती. करिश्मा प्रकाश ही दीपिकाची मॅनेजर आहे. कोणत्या एफआयआरमध्ये कोणाचं नाव एनसीबीने १५/20 प्रकरणात दीपिका पादुकोण, करिश्मा प्रकाश आणि रकुलप्रीत सिंग यांच्या नावाची नोंदणी केली आहे. तर १६/२० प्रकरणात श्रद्धा कपूर आणि सारा अली खानची नावं आहेत. गुरुवारी सिमॉन खंबाटाची चौकशी केली जात आहे. २५ सप्टेंबर रोजी दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंग आणि सिमोन खंबाटा यांच्यासह आता क्षितीज प्रसाद याचीही चौकशी केली जाईल. यानंतर, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची शनिवार, २६ सप्टेंबर रोजी चौकशी होणार आहे. ५० सेलिब्रिटींमध्ये कोण- कोण एनसीबीच्या रडारवर सध्या ५० सेलिब्रिटी आहेत. असं म्हटलं जातं की त्या सर्वांवरच ड्रग्ज घेण्याचा आरोप आहे. तसंच त्यांच्यावर ड्रग पार्टीचं आयोजन करणं, ड्रग्ज पेडलर्सकडून अमली पदार्ख विकत घेणं असेही अनेक आरोप आहेत. गुरुवारीच एनसीबीने रकुलला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण आपल्याला समन्स न मिळाल्याचं कारण सांगून ती एनसीबी कार्यालयात गेली नाही. आता रकुल शुक्रवारी एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर राहील. रकुलशी संपर्क साधण्याचा केला गेला प्रयत्न एनसीबीचे अधिकारी केपीएस मल्होत्रा म्हणाले की, रकुलप्रीत सिंगला चौकशीसाठीचा समन्स पाठवण्यात आला होता. तिच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात एक फोन कॉलही समाविष्ट आहे. मात्र तिच्याकडून कोणतंच उत्तर मिळालं नाही. रकुल तिचा फोन उचलत नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EtRXdb