Full Width(True/False)

इन्फिनिक्स Note 7 भारतात लाँच, पहिला सेल २२ सप्टेंबरला

नवी दिल्लीः बजेट सेगमेंटमध्ये एकापाठोपाठ एक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. टेक ब्रँड इनफिनिक्स ने स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने नवीन फोन मध्ये मोठा डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर सोबत फोन बाजारात उतरवला आहे. फोनच्या रियर पॅनेलवर ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे.सेल्फीसाठी होल पंच डिस्प्ले दिला आहे. वाचाः Infinix Note 7 ची किंमत कंपनीने हा फोन सध्या एकचा रॅम आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये उतरवला आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन तीन कलरमध्ये फॉरेस्ट ग्रीन, बोलिविया ब्लू आणि एदर ब्लॅकमध्ये खरेदी करता येईल. या फोनचा पहिला सेल २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर होणार आहे. वाचाः Infinix Note 7 चे वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.९५ इंचाचा पंच होल डिस्प्ले दिला आहे. एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 20.5:9 चा आस्पेक्ट रेशियो आहे. फोनमध्ये ९१ टक्के स्क्रीन बॉडी दिली आहे. फोन अँड्रॉयड XOS 6.1 आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी MediaTek Helio G70 चिपसेट दिला आहे. वाचाः गोल कॅमेरा मॉड्यूल रियर पॅनेलवर ४८ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक लो लाइट व्हिडिओ कॅमेरा दिला आहे. फोन क्वॉड एलईडी फ्लॅश युनिट सोबत आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोन ड्यूल स्पीकर्सच्या DTS 3D साउंड इनहँसमेंट सोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35GTZ4V