नवी दिल्लीः सॅमसंगने या वर्षी आपली Galaxy S20 सीरीज आणि Galaxy Note 20 सीरीज लाँच केली होती. आता कंपनी पुढील वर्षी Galaxy S21 सीरीज लाँच करण्याची तयारी करीत आहे. या सीरीजमध्ये लाँच होण्यास काही महिने उरले आहेत. परंतु, या दरम्यान सीरीजचे काही डिटेल्स समोर आले आहेत. TUV Rheinland च्या लिस्टिंगमध्ये सीरीजचे स्मार्टफोन पाहिले आहे. या ठिकाणी फोनचे मॉडल नंबर SM-G998 सांगितले आहे. कंपनीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळणार आहे. वाचाः ६० वॉटची फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सीरीजच्या या एस२१ अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये कंपनी EB-BG998ABY मॉडल नंबरची बॅटरी मिळणार आहे. यात 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे. कंपनी २१ अल्ट्रा मध्ये ६० वॉटची फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीचा वापर करू शकते. वाचाः चायनीज कंपनीने बनवली बॅटरी 3C लिस्टिंग च्या माहितीनुसार, गॅलेक्सी एस२१ मध्ये 3880mAh आणि गॅलेक्सी S21 प्लस मध्ये 4660mAh ची बॅटरी दिली जावू शकते. काही रिपोर्ट्समध्ये फोनची बॅटरी सॅमसंगची नाही तर चायनीज कंपनी डेव्हलप करीत आहे. वाचाः 40MP मिळू शकतो फ्रंट कॅमेरा सॅमसंगचा हा अपकमिंग स्मार्टफोन कंपनीने 5nm Exynos चिपसेट सोबत स्नॅपड्रॅगन 875 SoC प्रोसेसर सोबत येवू शकते. कंपनी या सीरीजच्या गॅलेक्सी एस२१ अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देवू शकते. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासोबत १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक १० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स सोबत एक ५एक्स ऑप्टिकल झूमचा टेलिफोटो लेन्स दिला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kIWWG6