Full Width(True/False)

64MP कॅमेऱ्याचा Realme 7i आज भारतात होणार लाँच, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः रियलमी आज आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन रियलमीच्या ७ सीरीजचा नवीन स्मार्टफोन असणार आहे. याआधी या सीरीज अंतर्गत आणि लाँच केलेले आहेत. आज लाँच होणाऱ्या रियलमी Realme 7i मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी मिळणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी या फोनला इंडोनेशियात लाँच केले होते. वाचाः या ठिकाणी पाहा लाइव्ह इव्हेंट फोनला आज दुपारी १२.३० वाजता लाँच करण्यात येणार आहे. या लाँच इव्हेंटला कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लाइव पाहता येवू शकते. लाँच इव्हेंटच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पाहिले जावू शकते. १५ हजाराच्या जवळपास असू शकते किंमत ऑरोरा ब्लू आणि पोलर ब्लू कलर ऑप्शन मध्ये येणाऱ्या या फोनची किंमत जाहीर करण्यात आली नाही. परंतु, इंडोनेशियात ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत भारतीय रुपयांप्रमाणे १५ हजार ६०० रुपये आहे. कंपनी या फोनला केवळ एकाच व्हेरियंटमध्ये लाँच करणार आहे. वाचाः Realme 7i ची वैशिष्ट्ये फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662SoC प्रोसेसर दिला आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्ट सोबत येणारा हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड Realme UI वर काम करतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. 5000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक दिला आहे. वाचाः हे प्रोडक्ट सुद्धा होणार लाँच रियलमी ७आय शिवाय कंपनी एनवन सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रश, स्मार्ट कॅम ३६०, १०० वॉट साउंडबार, 20000mAh पॉवर बँक2 आणि 55 इंचाचा SLED 4K टीव्ही सुद्धा लाँच करण्यात येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3llvBdD