मुंबई- 'बिग बॉस १४' सुरू होण्यापूर्वी निर्मात्यांनी स्पर्धकांच्या नावावरून पडदा उचलण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळे प्रोमो रिलीज करून ते या सीझनमधील स्पर्धकांची ओळख करून देत आहेत. यातूनच ते प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचवत आहेत. 'बिग बॉस' निर्मात्यांनी आतापर्यंत राधे मां आणि जान कुमार सानू याची ओळख करून दिली होती. आता एजाज खान, निक्की तंबोली, पवित्रा पूनिया आणि टीव्ही कपल अभिनव कोहली आणि रुबीना दिलैकच्या धांसू एण्ट्रीचे व्हिडिओ शेअर केले आहेत. या प्रोमो आणि व्हिडिओमध्ये निर्मात्यांनी स्पर्धकांची नावं उघड केली नसली तरी त्यांची झलक पाहून नक्की कोणते कलाकार आहेत ते स्पष्ट होतं. अभिनव शुक्ला-रुबीना दिलैकची रोमॅण्टिक एण्ट्री यापूर्वी अशी चर्चा होती की 'गोपी बहु' जिया मानेक 'बिग बॉस १४' मध्ये दिसणार आहे. हे जवळजवळ निश्चितच झालं होतं. पण तिने जास्त मानधन मागितल्यामुळे निर्मात्यांनी जिया मानेकऐवजी रुबीना दिलक आणि अभिनव शुक्लाला या सीझनसाठी विचारले. या सीझनमध्ये पारस छाब्राची एक्स गर्लफ्रेंड आणि सिद्धार्थ शुक्लाची मैत्रीण पवित्रा पूनियासुद्धा दिसणार आहे. निर्मात्यांनी तिचं नाव व्हिडिओमध्ये उघड केले नाही. पण तिच्या पाठीवरचा टॅटू पाहून ती पवित्रा असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. प्रोमोमध्ये ती 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स करताना दिसत आहे. 'बिग बॉस १४' मध्ये सिद्धार्थ शुक्ला 'बिग बॉस १४' हा रिअॅलिटी शो ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ३ ऑक्टोबरला याचा ग्रँड प्रीमिअर असणार आहे. यात सलमान खान प्रत्येक स्पर्धकाची ओळख करून देणार आहे. विशेष म्हणजे या सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खानदेखील दिसणार आहेत. हे तीन सेलिब्रिटी स्पर्धकांसाठी नवनवीन आव्हानं निर्माण करतील.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30qGPW9