Full Width(True/False)

मराठमोळ्या अभिनेत्रीने लॉकडाउनमध्ये केलेला आत्महत्येचा विचार

मुंबई- या महामारीमुळे अनेकांचं आयुष्य पुरतं बदलून गेलं. सारंकाही सुरळीत सुरू असताना अचानक लॉकडाउन सुरू झालं आणि बघता बघता होत्याचं नव्हतं झालं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना मानसिक आजाराने ग्रासलं. आर्थिक संकटामुळे अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर आर्थिक मदत मागावी लागली तर काहीजण फळं, भाज्या विकताना दिसू लागले. अभिनेत्री हिलाही लॉकडाउनमध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. काही महिन्यांपूर्वी एका पोस्टमध्ये सोनलने तिच्या मालिकेच्या निर्मात्यांनी तिला कशी मदत केली नाही ते सांगितलं. यासोबतच तिच्या मेकअप मॅनकडून तिला पैसे उधार घ्यावे लागल्याचा अनुभवही तिने या पोस्टमध्ये शेअर केला. आता सोनल त्या परिस्थितीतून बाहेर आली आहे आणि तिने कामाला पुन्हा सुरुवात केली आहे. लवकरच ती 'गुप्ता ब्रदर्स चार कुंवारे फ्रॉम गंगा किनारे या टीव्ही मालिकेमध्ये दिसणार आहे. ईटाइम्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सोनलने लॉकडाउन दरम्यान तिच्या मनात आत्महत्येचा विचार येऊन गेल्याचं सांगितलं. जेव्हा आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येचे विचार येऊ लागले सोनल म्हणाली की, 'मी आई- वडिलांसोबत राहते आणि एकुलती एक आहे. अनेकदा एकटीही राहिली आहे. जेव्हा माझ्याकडे काम नसतं तेव्हा नकारात्मक गोष्टी माझ्या मनात सहज येतात. लॉकडाउन दरम्यान, असे अनेकदा डोक्यात विचार आले की जर काम पुन्हा सुरू झालं नाही तर काय? आर्थिक अडचणी दूर झाल्या नाहीत तर मी काय करेन? मी नैराश्यात जाऊन जास्तीत जास्त नकारात्मक विचार करू लागले होते. याच काळात माझ्या डोक्यात आत्महत्येचेही विचार आले. सोनल पुढे म्हणाली, 'पण मी सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरवात केली. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे याची आठवण मी स्वतःला करून देऊ लागले. मी काही चुकीचं पाऊल उचललं तर त्यांचं काय होईल. जर आई- बाबा जवळ नसते तर कदाचित मी हे टोकाचं पाऊल उचललंही असतं. पण मी नेहमीच त्यांच्याबद्दल विचार करते. आता मी दु:खी असो किंवा आनंदी मी नेहमीच उघडपणे स्वतःला व्यक्त करते.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36nINKE