Full Width(True/False)

Bigg Boss 14: सर्वात महागडा स्पर्धक होत घरात एण्ट्री घेणार अली गोनी!

मुंबई- '' मध्ये सध्या अनेक नवनवीन ट्वीस्ट येत आहेत. स्पर्धक एकमेकांवर राग काढत आहेत. टास्क जिंकण्यासाठी जबरदस्ती करणं, शिव्या देणं , ओरडणं, रडणं देणं या गोष्टी आता सर्रास होताना दिसत आहेत. शोमध्ये अलीकडेच तीन नवीन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. त्याचबरोबर आता चौथा वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून 'ये है मोहब्बतें' फेम घरात प्रवेश करणार आहे. इतकंच नाही तर अली हा या सीझनमधला सर्वात महाग स्पर्धक असल्याचंही म्हटलं जातं आहे. टेलीचक्करच्या अहवालानुसार अली गोनीला 'बिग बॉस' ची ऑफर मिळाली आहे. त्याने या ऑफरचा स्वीकार केला असून तो लवकरच घरात प्रवेश करेल. रिपोर्ट्सनुसार अली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस' च्या घरात एण्ट्री घेईल. निर्मात्यांनी सीझनच्या सुरुवातीलाच अलीशी संपर्क साधला होता. पण आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याने ऑफर नाकारली होती. आता जास्मिन भसीन आहे सर्वात महागडी स्पर्धक आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या घरातील सर्वात महागडी स्पर्धक आहे. जास्मिन दर आठवड्याला तीन लाख रुपयांचं मानधन घेते. असं म्हटलं जात आहे की निर्मात्यांनी अलीला प्रत्येक आठवड्याला ३.५ ते ४ लाख रुपयांचं मानधन देण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे अली घरातला सर्वात महागडा स्पर्धक होईल. 'बिग बॉस १४' मध्ये सध्या कविता कौशिक, नैना सिंह आणि शार्दुल पंडितची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. अली घरात येण्याने कोणाला सर्वाधिक फायदा होणार असेल तर ती म्हणजे जास्मीन. जास्मीन आणि अली खूप चांगले मित्र आहेत. दोघं एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जात आहे. शोमध्ये जास्मीननेही अली घरात यावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. सध्या जास्मीन फक्त रडतानाच दिसत आहे. अशात अलीच्या येण्याने तिचा आत्मविश्वास वाढू शकतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mCDE6p