Full Width(True/False)

Realme चा दिवाळीआधीच धमाका, ५ कोटी स्मार्टफोन्सची विक्री

नवी दिल्लीः रियलमी जगातील सर्वात वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. काउंटरपॉइंट ने २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोन शीपमेंटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, रियलमी ५० मिलियन स्मार्टफोनच्या विक्री सोबत सर्वात वेगाने वाढणारी कंपनी बनली आहे. वाचाः रियलमीने २०१८ च्या तिसऱ्या तिमाही ते २०२० च्या पहिल्या तिमाही म्हणजेच नऊ तिमाहीत हे यश मिळवले आहे. तसेच कंपनीने एक तिमाहित १४.८ मिलियन युनिट शिप करून एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. गेल्यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीतच्या तुलनेत कंपनीने २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत १३२ टक्के वाढीची नोंद केली आहे. काउंटरपॉइंटच्या रिसर्च अॅनालिस्ट अभिलाष कुमार यांच्या म्हणण्यानुसार, रियलमीने आपल्या बाजारात भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि फिलिपिन्स सह अन्य काही दुसऱ्या साउथ इस्ट देशात टॉप ५ आणि टॉप ३ मध्ये जागा बनवण्यात यश मिळवले आहे. वाचाः कंपनीनीच्या या यशावर रियलमीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी सांगितले, रियलमीने नेहमी आपल्या ग्राहकांसाठी बेस्ट टेक लाइफस्टाइल एक्सपिरियन्स देण्यावर काम केले आहे. तसेच ५० मिलियन स्मार्टफोनची विक्री सोबत देशातील वेगावे वाढणारा ब्रँड बनला आहे. भारतात कंपनीचे आता ३० मिलियन युजर्स आहेत. वाचाः २०२० मध्ये रियलमीने आतापर्यंत ५० टक्क्यांहून जास्त एआय प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनी देशात स्मार्टफोन शिवाय, इयरबड्स, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच, रियलमी बँड यासारखे प्रोडक्ट्सवर लक्ष केंद्रीत करीत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34FNxtM