Full Width(True/False)

'दख्खनचा राजा जोतिबा' मालिका बंद करावी; पुजाऱ्यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर दख्खनचा राजा जोतिबाचा चुकीचा इतिहास दाखवत भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही मालिका तातडीने बंद करावी या मागणीसाठी जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांनी मंदिरासमोर जोरदार निदर्शने केली . सध्या एका वाहिनीवर निर्मित कोठारे प्रॉडक्शनचा '' ही मालिका प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेच्या प्रक्षेपणपूर्वी पुजाऱ्याकडून माहिती घेतली जाईल. चुकीची माहिती दिली जाणार नाही असा शब्द निर्माते महेश कोठारे यांनी पुजाऱ्यांना दिला होता, पण प्रत्यक्षात सध्या जी मालिका दाखवली जात आहे , त्यामध्ये ते अनेक चुकीच्या घटना असल्याचा आरोप गुरव समाजातील पुजाऱ्यांनी केला आहे . चुकीची माहिती दाखवून भावना दुखवल्याबद्दल व खोटी माहिती प्रसारित करून फसवून केल्याबद्दल कोठारे प्रोडक्शनवर कारवाई करा अशी गुरव समाजाच्या वतीने सरपंच राधाताई बुणे यांना निवेदन दिले. या मालिकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली असून खोटा इतिहास खपवून घेतला जाणार नाही असे उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य सुनिल नवाळे यांनी मालिकेतील चुकीची माहिती दाखवली तर ती खपवून घेणार नाही व असे पुढे असे झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला. सामाजिक कार्यकर्ते आनंदा लादे यांनी जोतिबा देवाचा इतिहास हा केदार विजय ग्रंथानुसार नसून यामुळे विटंबना झाली आहे असे सांगितले. जोतिबा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष नवनाथ लादे यांनी मालिका ही पौराणिक स्तरावर असावी असे सांगितले. सदर मालिकेत भ्रमनिरास झाला असल्याचा आरोप अनेकांनी केला. या मालिकेत अनेक चुकीच्या गोष्टी दाखविल्या असून ही मालिका बंद करावी अशी मागणीही या निदर्शने वेळी करण्यात आली. या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू असून त्यासाठी चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभा केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oGjLgM