मुंबई- तारक मेहता का ओलता चश्मामध्ये गोगीची भूमिका साकारणार्या टीव्ही अभिनेता साम शाह याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना समय शहाच्या बोरिवली येथील इमारतीजवळची आहे. काही मुलांनी शहा याच्याशी गैरवर्तन करुन त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. आतापर्यंत त्या मुलांची ओळख पटली नसून पोलिसांना या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. समयला २७ ऑक्टोबर रोजी धमकी देण्यात आली होता. आश्चर्य म्हणजे समयला धमकावण्याची ही सलग तिसरी घटना आहे. समय याने बोरिवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सीसीटीव्ही फुटेजचा फोटो शेअर केला. यात समयला धमकावणाऱ्याचा चेहरा दिसत आहे. ही संपूर्ण घटना रात्री घडली. समयने पोस्ट शेअर करताना लिहिले की, 'दोन दिवसांपूर्वी हा माणूस माझ्या इमारतीत आला आणि कोणत्याही कारणाशिवाय त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मला माहीतही नाही की तो कोण आहे. मला शिव्या देण्यामागचं कारण काय.. त्याने मला ठार मारण्याचीही धमकी दिली. माझ्यावर प्रेम करणार्या चाहत्यांना या गोष्टीची माहिती देऊन ठेवतो. मला वाटतं की जर मला काही झालं तर ते माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हे माहिती असणं योग्य राहील. धन्यवाद.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37TsXZ3