Full Width(True/False)

iPhone 12 आणि 12 Pro चा आजपासून सेल, मिळवा हजारो रुपयांची सूट

नवी दिल्लीः अॅपलचा आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो स्मार्टफोनचा भारतात आजपासून सेल सुरू झाला आहे. ग्राहक या स्मार्टफोन्सला ऑनलाइन Apple store आणि देशभरातील कंपनीचे रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकते. ज्या ग्राहकांनी २३ ऑक्टोबर पासून अॅपलचे डिव्हाईसला प्री बुक केले होते. त्यांना आजपासून डिलिवरी मिळणार आहे. कंपनीने या सीरीज सोबत एकत्र चार मॉडल्स लाँच केले होते. ज्यात आणि पहिले मॉडल्स आहेत. या फोनचा भारतात सेल सुरू झाला आहे. वाचाः भारतात किंमत आणि ऑफर्स भारतात आयफोन १२ चे बेस मॉडल ६४ जीबी ची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे. तर याच्या १२८ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत ८४ हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी मॉडलची किंमत ९४ हजार ९०० रुपये आहे. याचप्रमाणे आयफोन १२ प्रो च्या १२८ जीबी मॉडलची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये, २५६ जीबी मॉडलची किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये आहे. ५१२ जीबी मॉडलची किंमत १ लाख ४९ हजार ९०० रुपये आहे. वाचाः अॅपल या स्मार्टफोन्सवर अनेक डिस्काउंट ऑफर देत आहे. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन एक्सचेंज करण्यासाठी असेल तर याच्यावर २२ हजारांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच एचडीएफसी क्रेडिट कार्ड धारकांना ६ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि डेबिट कार्डवर १५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. तसेच अनेक प्रकारचे ईएमआय पर्याय उपलब्ध आहेत. वाचाः आयफोन १२ चे वैशिष्ट्ये आयफोन १२ एक ५ जी स्मार्टफोन आहे. यात ६.१० इंचाचा डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ए१४ बायोनिक प्रोसेसर आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टम दिला आहे. आयफोन १२ मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि १२ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा ३डी फेस रेकग्निशन, IP68 रेटिंग, ड्यूल सिम सपोर्ट यासारखे फीचर्स मिळतात. वाचाः आयफोन १२ प्रोचे वैशिष्ट्ये या दोन्ही फोनमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे यातील रियर कॅमेरा आहे. आयफोन १२ मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. १२ प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रो मध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि १२ मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर दिला आहे. या शिवाय फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ६.१० इंचाचा डिस्प्ले, ए१४ बायोनिक प्रोसेसर, ३डी फेस रेकग्निशन IP68 रेटिंग, ड्यूल सिम सपोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mFvme9