Full Width(True/False)

हाथरस घटनेचा खुर्ची आणि राजकारणासाठी वापर ; तनुश्रीनं व्यक्त केला संताप

मुंबई: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॉस्पिटल बाहेर आंदोलन केलं गेलं आणि नंतर कँडल मार्च काढण्यात आला.सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी देखील संताप व्यक्त केला. दरम्यान महिलांवर होणाऱ्या अत्याचावर वाचा फोडण्यासाठीच्या 'मी टू' मोहिमेमुळं चर्चेत आलेली अभिनेत्री हिनं देखील या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देशातील तरुण मुलं हैवानाचं रुप घेतायत;असं तिनं म्हटलं आहे. करोना लॉकडाऊनमुळं तनुश्री अमेरिकत होती, काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली आहे. इथं झालेल्या घटनेमुळं प्रचंड दु:खी असल्याचं तिनं म्हटलं आहे. '' ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीनं अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या. हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये साठी यामागचं मूळ कारण आपण शोधायला हवं, असं ती म्हणतेय. देशातील तरुण वर्ग, मुलांमध्ये राक्षसीवृत्ती का वाढतेय, याचा आपण विचार करायला हवा, असंही तनुश्री म्हणाली. देशात सतत होणाऱ्या घटानांचा त्रास होत असून पुरुषांना स्त्रीयांच रक्षण करण्यासाठी शारिरीक ताकद देवानं जास्त स्त्रीयांपेक्षा जास्त दिली आहे. असं असताना पुरुषांकडून स्त्रीयावर असले अत्याचार होत असतील तर रक्षकच भक्षक होतोय, असं म्हणावं लागेल. तसंच देशातील बलात्काराच्या घटनांसाठी एक समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत हे लक्षात घ्यायला हवं. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होत असेल तर त्याबद्दल आवाज उठवला गेला पाहिजे. सोशल मीडियावर मोहिमा सुरू होतात. पण कालांतरानं त्या थंडही होतात. समोरचा गुन्हेगार कितीही मोठा आणि ताकदवार असला तरी त्याच्यावर समाजाने बहिष्कार घालायला हवा, असं तनुश्रीनं म्हटलं आहे. तसंच इतक्या गंभीर प्रकरणाचा काही लोकं त्याच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी , राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोपही तनुश्रीनं केला. काय आहे प्रकरण? १९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती, तसंच पाठीचा कणाही मोडला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती. शुद्धीवर आल्यानंतर तिनं न बोलताच आपल्यावर झालेले सगळे अत्याचार इशाऱ्यांतूनच व्यक्त केले. तिच्या अंगावरच्या जखमाच सगळं काही सांगत होत्या. गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती आणि आज तिची ही लढाई अर्धवट राहिली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2GK19e6