Full Width(True/False)

ड्रग कनेक्शनमध्ये 'A'नावाच्या स्टारची चर्चा होताच; अक्षयनं शेअर केला व्हिडिओ

मुंबई: अभिनेता मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा वापर झाल्याचे समोर आल्यानंतर एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याअंतर्गत एनसीबीच्या विशेष पथकाने सुशांतसिंहची मैत्रिण तसंच सिनेतारकांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका मोठ्या कंपनीची अधिकारी जया शाह, यांच्या चौकशीत सिनेतारकांची नावे समोर आली होती. त्यावरून 'एनसीबी'नं अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर व राकूलप्रीत सिंह यांची चौकशी केली आहे. यानंतरही अनेक नावांचा खुलासा होत आहे. बॉलिवूडमधील हे ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर या कलाकारांचे चाहते आणि प्रेश्रकांकडून मोठ्याप्रमाणत संताप व्यक्त करण्यात येतोय. बॉलिवूडमधील स्टार कलाकारांना देशातील युवा वर्ग आदर्श मानत असतो. असं असताना कलाकारांची ही बाजू समोर आल्यानंतर प्रेक्षकांकडून बॉलिवूडवरच बहिष्कार घालण्यात यावा,अशी मागणी होऊ लागली. त्यामुळं अभिनेता यानं एक व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना एक विनंती केली आहे. काय म्हटलंय अक्षयनं या व्हिडिओत?अनेक दिवसांपासून तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या होत्या, कसं बोलू काहीच कळत नव्हतं, आज विचार केला की, बोलायलाच हवं. जड अंतःकरणानं तुमच्याशी बोलताय. सध्या आजूबाजूला नकारात्मकता इतकी वाढलीए की कसं बोलू काहीच कळत नव्हतं. आम्ही स्टार असलो तर, तुम्ही तुमचं प्रेम देऊन आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे. आम्ही चित्रपटातून देशाची संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवली आहे. देशात घडणारी प्रत्येक गोष्ट आम्ही चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केलाय. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या अकाली निधनानंतर अनेक प्रश्नांना तोंड फुटलं. या सर्वांमुळं तुम्हाला जितकं दु:ख झालं तितकं आम्हालाही झालं आहे. यानंतर आम्हा कलाकारांना आमच्या आत डोकावणं भाग पडलंय. आमच्या इंडस्ट्रीबद्दलच्या अनेक गोष्टींबद्दल विचार करणं आम्हाला भाग पडलं. आम्ही आमच्या चित्रपटांद्वारे देशाची संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनात काय आहे? तुमच्या भावना काय आहेत? हे आम्ही पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज तुम्हाला राग आला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर खूप मुद्दे समोर आले. त्यांनी तुमच्यासह आम्हालाही दुःखी केलं आहे. या सर्व प्रकारानंतर आमच्या इंडस्ट्रीबद्दल विचार करणं भाग पडलंय. वाचा: सध्या नारकोटिक्स आणि ड्रग्स केनक्शनची चर्चा सुरु आहे. इंडस्ट्रीतील ड्रग कनेक्शन मी नाकारू शकत नाही. काही गोष्टी मान्य कराव्याच लागतील. परतु सरसकट सर्वच लोकं याच्याशी संबंधीत नाहीत, हेच मला सांगायचं आहे. वाचा: या प्रकरणात प्रशासनाकडून तपास केला जात आहे. जे निर्णय घेतले जातील ते योग्यच असतील. चित्रपटसृष्टीतील सर्वजण ही गोष्ट मान्य करुन प्रशासनाला सहकार्य करतील. पण मी तुम्हाला एकच विनंती करतो की, पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम नका करु.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cTPeGI