Full Width(True/False)

अभिनेत्री सोनाली खरे करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक; दिसणार 'या' भूमिकेत

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोनाली तब्बल आठ वर्षांनतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. २०१४मध्ये ‘’या मालिकेत सोनाली दिसली होती. त्यानंतर ती छोट्या पडद्यापासून काहीशी दूर राहिली होती. सोनालीनं मालिकांमधून ब्रेक घेतला होता.मात्र चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या आठ वर्षाच्या ब्रेकमध्ये तिनं '७ रोशन व्हिला, हृदयांतर', सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात परततेय. कलर्स मराठीवरच्या ‘’ या कुकिंग शोमध्ये ती सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे. 'मला आनंद आहे की, मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय. करणं, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही. आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाउनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामुळं या शोची रंगीत तालिम झाली होती. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही या शोमध्ये स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, याचा एक वेगळाच आनंद आहे', असं आपल्या कमबॅकविषयी सोनाली म्हणते. सोनालीनं या पूर्वी 'कॉलेज माझी जान', 'गमंतगढ', 'आम्ही सारे खवैय्ये', अशा अनेक कार्यक्रमांचं सुत्रसंचालन केलं होतं.आता सोनालीच्या चाहत्यांना तिला टीव्हीवर पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. 'न्यू नॉर्मल’मध्ये शुटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल सोनाली म्हणते की, 'सतत मास्क घालण्याची सवय नसते. त्यामूळे पूर्णवेळ मास्क घालून शूटिंगस्थळी राहणं, हे थोडं दमछाक करवणारं असलं, तरीही आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे, असं मला वाटतं. स्वादिष्ट जेवण बनवण्याची पहिली पायरी ही स्वच्छता (hygine) आहे. त्यामुळं सेटवरचं वातावरणं तसंच असतं, याचा मला आनंद आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jluCbV