Full Width(True/False)

मल्टीप्लेक्स सुरू करण्याच्या ट्वीटवर ट्रोल झाला अभिषेक बच्चन

मुंबई- अनलॉक ५ अंतर्गत १५ ऑक्टोबरपासून थिएटर आणि मल्टिप्लेक्स उघडण्याची घोषणा केली गेली आहे. या घोषणेचं अभिषेक बच्चनने स्वागत केलं. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने ट्वीटह केलं. पण त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेकनेही त्यांना मोठ्या धैर्याने आणि शांतपणे जशास तसं प्रत्युत्तर दिलं. अभिषेकने दिला सकारात्मक प्रतिसाद चित्रपटगृह सुरु होण्याच्या बातमीवर आनंद व्यक्त करताना अभिषेकने ट्वीट करत म्हटलं की, 'या आठवड्याची सर्वात चांगली बातमी..' त्याच्या या ट्वीटला एका यूझरने उत्तर देत म्हटलं की, 'मग आता तू बेरोजगार होणार नाही का?' यावर अभिषेकने अगदी शांतपणे आपलं प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी बरोजगार होणार की नाही हे तुमच्या (प्रेक्षकांच्या) हाती आहेत. तुम्हाला माझं काम आवडत नसेल तर मला नवीन काम मिळणार नाही. आपल्याला आमचे कार्य आवडत नसल्यास आम्हाला आमची पुढची नोकरी मिळणार नाही. म्हणूनच, आम्ही सर्व गोष्टी पणाला लावून काम करतो आणि सर्वकाही चांगल्या होण्याची अपेक्षा करतो.' जुलैमध्ये झाली होती करोनाची लागण, लवकरच दिसेल बॉब बिस्वासमध्ये अभिषेक बच्चनला सोशल मीडियावर ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याला अनेकदा चिथवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण प्रत्येकवेळी अभिषेक शांत डोक्याने समोरच्याला उत्तर देऊन ट्रोलर्सचं तोंड बंद करतो. जुलैमध्ये अभिषेक बच्चनला करोनाची लागण झाली होती. आजारातून बरा झाल्यानंतर तो जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ताच्या साखरपुड्यात दिसला होता. अभिषेकच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सवकरच तो 'बॉब बिस्वास' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Gnwrr1