मुंबई: काही दिवसांपूर्वीच नेहा कक्करनं बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याची कबुली दिली. रोहनप्रीतच्या आधी 'इंडियन आयडॉल'च्या सेटवर नेहा आणि गायक यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, आता नेहापाठोपाठ गायक आदित्य नारायण देखील विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. खुद्द आदित्यनं याबाबतची माहिती दिली आहे. पण असं असलं तरी करोना लॉकडाउनमुळे आदित्य नारायणवर आर्थिक संकट आलं असून त्यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये केवळ १८ रुपये शिल्लक असून उदर्निवाहासाठी तो आता त्याची बाइक विकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आदित्यनं प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य म्हणतो की, होय, मी असं म्हटलं होतं, ही मुलाखत काही महिन्यांपूर्वीची आहे. करोनाचं संकट अचानक आपल्यासमोर उभं राहिलं. पुढील ६-७ महिने मी काम करणार नाही, याची मी कल्पनाच केली नव्हती. करोना लॉकडाउनपूर्वीच मी नवीन घर घेतलं. त्याचे हफ्ते भरण्यासाठी मी माझे म्युचल फंड्स मोडले होते. पण याचा अर्थ मी दिवाळखोर किंवा कंगाल झालोय, असं होत नाही ना. माझं लग्न होणार आहे. माझ्या सासरची मंडळी आता काय विचार करत असतील. अनेकांनी मला मदत देऊ केली, त्यांचे मी आभार मानतो. पण मी अजूनही कंगाल झालो नाहीए. चाहत्यांना मी एवढंच म्हणेन की, आतापर्यंत दिली तशीच साथ पुढंही असूद्या. एका मुलाखतीमध्ये आदित्यनं आपण लग्न बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं आहे. आदित्य या वर्षाच्या अखेरीस त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री हिच्यासोबत लग्न करणार आहे. 'मी माझं नातं कधी गुप्त ठेवलेलं नाही. एक वेळ अशी आली की आमच्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही यावर न बोलण्याचा विचार केला होता' असं आदित्य म्हणाला. त्यानंतर त्याने त्याची आणि श्वेताची ओळख कुठे आणि कशी झाली हे सांगितले आहे. 'शापित' चित्रपटाच्या सेटवर माझी आणि श्वेताची ओळख झाली. सुरुवातीला आमच्यामध्ये मैत्रीचं नातं होतं आणि आम्हाला आमच्या करिअरवर लक्ष द्यायचं होतं. गेल्या १० वर्षांत आमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. येत्या डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही लग्नाच्या बेडीत अडकणार आहोत', असं आदित्य पुढे म्हणाला. श्वेतानं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/352i0Bw