Full Width(True/False)

यापुढं हिंदू देवतांचा अपमान करण्याचं धाडस होणार नाही; मुकेश खन्ना यांची पोस्ट व्हायरल

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याचा '' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या नावावरून वाद निर्माण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावात बदल केला असला तरी अभिनेते यांची या चित्रपटासंदर्भातली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुकेश खन्ना देखील चर्चेत आहेत. बॉलिवूड तसंच टीव्ही इंडस्ट्रीतील काही मुद्द्यावर ते उघडपणे आपली मतं व्यक्त करत आहेत. अक्षयच्या या चित्रपटावरूनही त्यांनी निर्मात्यांवर टीका केली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये अनेक गोष्टींवर निशाणा साधला आहे. 'लक्ष्मीसमोर बॉम्ब हा शब्द लिहिणं हे निंदनीय असून व्यावसायिक हितासाठी हे सगळं केलं जात आहे. असं असताना याला परवानगी देण्यात यावी का? तर नाहीच. तुम्ही 'अल्लाह बॉम्ब' किंवा 'बदमाश जिझस' अशी नावं चित्रपटांना देऊ शकता का? याचं उत्तर आहे नाही. मग लक्ष्मी बॉम्ब का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच चित्रपटांच्या नावाखाली हिंदूंचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यावर त्यांनी टीका केली आहे. दरम्यान,' बॉम्ब' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाचं नाव बदलून 'लक्ष्मी' असं केलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी सीबीएफसीशी झालेल्या चर्चेनंतर, प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन नाव बदलण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांनी नाव बदलण्याचा निर्यण घेतल्यानंतर मुकेश खन्ना यांनी या निर्णयाचं स्वागत करत आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्यासाठी आणि देशातील सर्व जागरूक देशवासीयांना एका गोष्टीचा आनंद आहे की या चित्रपटाचं शीर्षक आथा 'लक्ष्मी' असं बदलण्यात आलं आहे.'बॉम्ब' निकामी करण्यात आलाय. यापुढं कोणताही निर्माता हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचं धाडस करणार नाही', असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. येत्या दिवाळीमध्ये 'लक्ष्मी ' हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'कंचना' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अभिनेत्री अक्षयसोबत मुख्य भूमिकेत असून चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e9Gvk6