Full Width(True/False)

नेहा कक्कड आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे फोटो- व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली- आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या हळदीपासून संगीत, साखरपुडा आणि मेहंदीपर्यंतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. तिचे चाहतेही यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. नवरीच्या वेशात सुंदर दिसत होती नेहा कक्कड लग्नासाठी नेहा कक्करने पीच कलरचा लेहेंगा घातला होता. नवरीच्या पेहरावात ती खूपच सुंदर दिसत होती. (Instagram@nehakakkarfanpage817) नवरा मुलगाही शेरवानीत उठून दिसत होता रोहनप्रीतने लग्नासाठी नेहाच्या लेहेंगाच्या रंगाप्रमाणे पीच कलरची शेरवानी घातली होती, ज्यामध्ये तो देखणा दिसत आहे. ९ ऑक्टोबरला नात्याचा केला खुलासा नेहा आणि रोहनप्रीतने ९ ऑक्टोबरला दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल सांगितलं. एवढंच नाही तर त्यानंतरच दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यांच्या फोटोंवरून दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चाही बी- टाऊनमध्ये होऊ लागली. व्हिडिओ- इथे पाहा नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंगचं लग्न


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TlNPjb