Full Width(True/False)

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सीबीआयकडून बहिणींना अटक होण्याची शक्यता

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयकडून होण्याच्या भीतीनं दोघींनीही मुंबई हाय कोर्टात धाव घेतली आहे. सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री हिनं केला आहे. रियानं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांनी या एफआयरची एक प्रत सीबीआयला पुढील तपास करण्यासाठी दिली असून, या एफआयरच्या आधारे सुशांतच्या बहिणींना अटक करू शकते. अटक होण्याच्या भीतीनं सुशांतच्या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयाकडं या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी करण्याची विनंती केली आहे. एफआयरमध्ये गंभीर आरोपरियानं वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल केली आहे. रियानं सुशांतची बहिण प्रियांका हिच्यावर सुशांतचे 'बोगस मेडिकल प्रिस्क्रिप्शन' बनवून घेतल्याचा आरोप केला आहे. तर वांद्रे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील बनावट डॉक्टर तरुण कुमार यांचं नावदेखील आहे. त्यांची देखील चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. रियानं तिच्या तक्रारीत स्पष्ट म्हटलं आहे, की सुशांतसाठी देण्यात आलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये बदल करण्यात आले आणि ते प्रिस्क्रिप्शनही बनावट होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या बहिण आणि डॉक्टर यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीएस) कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेची डिलिव्हरी करणं), कलम ४६४ (खोटी कागदपत्र तयार करणं), कलम ४६५,४६६, ४६८, ४७८, ३०६ आणि १२० बी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.रियानं याआधी सात पानांची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर बारा तासांच्या आतच पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31KVRXx