नवी दिल्लीः एलजी कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनमध्ये जबरदस्त ड्यूल स्क्रीन डिझाईन देण्यात आली आहे. यात एक स्क्रीन ९० डिग्री क्लॉकवाइज रोटेट होते. ज्यात टी शेप डिझाईन बनते. याप्रमाणे दोन्ही स्क्रीनचा वापर एकत्र केला जातो. यासोबतच कंपनीने LG Velvet Dual Screen सुद्धा भारतात लाँच केले आहे. वाचाः फोनची किंमत कंपनीने एलजी विंग स्मार्टफोनची किंमत ६९ हजार ९९० रुपये ठेवली आहे. याच्या १२८ जीबी व्हेरियंटची किंमत आहे. फोनचा २५६ जीबीचे मॉडल भारतात आणले नाही. स्मार्टफोनला दोन कलर ऑप्शनमध्ये आणले आहे. फोनची विक्री ९ नोव्हेंबर पासून होणार आहे. याआधी फोनला दक्षिण कोरियात लाँच करण्यात आलेले आहे. या ठिकाणी या फोनची किंमत ७१ हजार ४०० रुपये ठेवली आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये हा फोन एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. जो अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये दोन स्क्रीन आहेत. याची प्रायमरी स्क्रीन ६.८ इंचाची आहे. फोनमध्ये ३.९ इंचाचा फुल एचडी प्लस G-OLED सेकंडरी डिस्प्ले दिला आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा एक आणि अल्ट्रा वाइड लेन्स सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा पॉप अप फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. जी वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oyA6no