मुंबई- बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने हिला जामीन मंजूर केला. एनसीबीने याच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर तिला अटक केली होती. महिनाभर तुरूंगात राहिल्यानंतर रिया तिच्या घरी आली. असं असलं तरी बेल ऑर्डरमध्ये रियासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. त्या आठ अटी कोणत्या त्या इथे जाणून घेऊ.. पहिली अट- रियाला १ लाखांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन दिला जाईल. दुसरी अट- रियाला आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करावा लागेल. तिसरी अट- एनडीपीएस, मुंबईच्या विशेष न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय रिया देश सोडून जाऊ शकत नाही. चौथी अट- जर रिया मुंबईच्या बाहेर जाणार असेल तर तिला तपास अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल आणि तसेच प्रवासापूर्वीच तिला प्रवासाबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. पाचवी अट- रियाला पुढील सहा महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत तपासणा यंत्रणेच्या कार्यालयात आपली उपस्थिती नोंदवावी लागेल. सहावी अट- जोपर्यंत योग्य कारण देण्यात येणार नाही तोवर रियाला कोर्टाच्या तारखांना हजर रहावंच लागेल. सातवी अट- या प्रकरणाच्या पुरावा किंवा तपासात रिया छेडछाड करू शकत नाही. आठवी अट- जामीनावर सोडल्यानंतर पुढील १० दिवस रियाला सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान जवळच्या पोलीस ठाण्यात हजर रहावे लागेल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HZT4T8