नवी दिल्लीः BSNL ने नवीन प्रमोशन ऑफर अंतर्गत सर्व प्रीपेड प्लानमध्ये २५ टक्के अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सर्व आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्ससह नवीन प्लानमध्ये अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत याचा फायदा मिळू शकतो. टेलिकॉम प्रोव्हाईडरने ‘Customer Delight Month' सेलिब्रेशन अंतर्गत बीएसएनएलला २० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने २५ टक्के डेटा ऑफर लाँच केला आहे. वाचाः बीएसएनएलच्या तामिळनाडूच्या वेबसाईटवर एक सर्क्यूलर जारी करून या ऑफरची माहिती दिली आहे. तसेच कंपनीने राजस्थान, पंजाब, तेलंगाना ट्विटर अकाउंट्सवर याची घोषणा केली आहे. बीएसएनएलने हे स्पष्ट केले आहे की, २५ टक्के एक्स्ट्रा डेटा बेनिफिट सर्व सर्कलमध्ये उपलब्ध होणार आहे. या डेटा ऑफर अंतर्गत सर्व सध्याच्या नवीन प्लान मध्ये याचा फायदा मिळणार आहे. यात स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सचा सुद्धा समावेश आहे. याचाच अर्थ युजर्संना प्लानसोबत बेसिक डेटासोबत २५ टक्के डेटा मिळणार आहे. ही प्रमोशनल ऑफर ३१ ऑक्टोबर पर्यंत लाइव्ह आहे. वाचाः बीएसएनएलच्या चेन्नई सर्कलमध्ये ४९ रुपयांचा लाँच केला होता. या प्लानमध्ये १०० मिनिट फ्री कॉलिंग मिळते. एफयूपी लिमिट संपल्यानंतर युजर्संना ४५ पैसे प्रति मिनिट याप्रमाणे कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागतात. या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री मिळते. टेलिकॉम कंपनीने बीएसएनएलचा हा प्रीपेड प्लान २९ नोव्हेंबर पर्यंत अॅक्टिव राहणार आहे. वाचाः ४९९ रुपयांच्या Work@Home प्रमोशनल ब्रॉडबँड प्लानची वैधता कंपनीने अंदमान आणि निकोबार सर्कलला सोडून बाकी सर्व सर्कल्समध्ये वाढवली आहे. या प्लानमध्ये युजर्संना ९० दिवसांसाठी फ्री इंटरनेट मिळते. Work@Home प्रमोशनल ब्रॉडबँड प्लान मध्ये रोज १० एमबीपीएस पर्यंत स्पीड सोबत ५ जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2I0LpEi