मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री सतत वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत आहे. कंगनानं बॉलिवूड इंडस्ट्रीवरही अनेक आरोप केले आहे. यावर ज्येष्ठ अभिनेत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कंगनाच्या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं बॉलिवूडवर केलेले आरोप अंत्यंत अपमानास्पद आहेत. या गोष्टीचा आनंद आहे की, कंगनानं बॉलिवूड इंडस्ट्रीला स्त्रीवाद आणि राष्ट्रवाद शिकवला आहे. कंगनाला या गोष्टीची भीती वाटत असावी की, एक दिवस ती चर्चेत राहणार नाही. तिला जे काम येतं त्यात तिनं लक्ष द्याव, अभिनय येतो तिनं तेच करावं,असंही शबाना आझमी म्हणाल्या. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये भूकंप आला आहे. सिनेइंडस्ट्रीवर नेहमीच आरोप झालेत. बॉलिवूडवर निशाणा साधणं सोप्प राहिलं आहे. शेतकऱ्यांची आंदोलणं, चीनचं आक्रमण, अर्थव्यवस्था अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावंरून लक्ष भटकवण्यासाठी विरोधकांकडून बॉलिवूडवर आरोप केल्याचं शबाना आझमी म्हणाल्या. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासवरही शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. सुशांतच्या केसची दिशा भरकटली, असंही त्या म्हणाल्या. 'जस्टीस फॉर सुशांत' वरून हा मुद्दा हॉलिवूड ड्रग कनेक्शनपर्यंत पोहोचला. लोकांनी सध्या मानसिक आरोग्यावर बोलायला हवं, पण वेगळ्याच गोष्टींची चर्चा होतेय, असं शबाना आझमी यांनी म्हटलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lhz50B